बारामतीचा आशीर्वाद कबड्डी संघ अजिंक्‍य

निमसाखरमध्ये राज्यस्तरीय खुल्या स्पर्धा ः कळंबचा राणाप्रताप उपविजेता

निमसाखर-निमसाखर (ता. इंदापूर) येथे राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धेत अटीतटीच्या सामन्यात बारामतीच्या आशीर्वाद संघाने अजित माळी यांचे 31 हजारांचे प्रथम क्रमांकाचे तर द्वितीय क्रमाकांचे संतोष गिरमे यांचे 21 हजारांचे बक्षिस कळंब (ता. इंदापूर) राणा प्रताप संघाने व गिरीश गिरमे यांचे तृतीय क्रमाकांचे 15 हजार रुपयांचे बक्षिस कळंबच्याच महाराणा प्रताप संघाने पटकावले. या यशस्वी संघाचे शाल श्रीफळ व चषक देऊन सन्मान करण्यात आला.
रविवारी (दि. 26) येथील एनईएस हायस्कूल क्रीडांगणावर राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. कबड्डीच्या अंतिम सामन्यावेळी निमसाखरकरांनी “प्रो कबड्डी’ प्रमाणे सामन्याचा थरार अनुभवला. शेवटचा सामना झाला तो बारामतीच्या आशीर्वाद व कळंब (ता. इंदापूर) या दोन संघामध्ये उत्सुकता वाढवणारा सामना झाला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत शेवटच्या एका मिनिटापर्यंत बरोबरीत असलेला सामना शेवटच्या क्षणी एक गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक आशीर्वाद मच्छी ढाबा बारामती संघाने पटकाविला. या स्पर्धेत उत्कृष्ट चढाईचे पारितोषिक आशीर्वाद मच्छी ढाबाच्या चेतन थोरात, उत्कृष्ट पकड महाराणा प्रतापच्या महादेव आवटे, उत्कृष्ट खेळाडु राणा प्रतापच्या किरण मगर तर शिस्तबद्ध संघाचे पारितोषिक जय हनुमान संघ सोमनथळीच्या संघाला देण्यात आले. यावेळी युवराज कारंडे व संतोष नलवडे यांचे चतुर्थ क्रमांकाचे बक्षिस इंदापूर व्यायाम मंडळाच्या संघाला देण्यात आले. कबड्डी सामन्याचे आयोजक नितीन कारंडे यांच्या उपस्थित बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे नियोजन उत्कर्ष कल्ब निमसाखर व सुनील कारंडे, जयकुमार कारंडे, रमेश रणवरे, भारत दरेकर, सुभाष जाधव, भाऊ पलंगे, प्रकाश कदम, सोमनाथ रणवरे यांच्याकडून करण्यात आले. निमसाखर सोसायटीचे चेअरमन विजयसिंह रणवरे, यशवंत सोसायटीचे चेअरमन नंदकुमार रणवरे उपसरपंच पाडुरंग पानसरे, सुरेश लवटे, आदी मान्यवर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)