बारणेंना लाखाचा ‘लिड’

पिंपरी – मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे तब्बल 1 लाख 2 हजार 962 मतांनी आघाडीवर आहेत. बारणेंची आघाडी मोडीत काढणे राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांच्यासाठी आव्हानात्मक ठरत आहे.

श्रीरंग बारणे यांना 3 लाख 36 हजार 119, पार्थ पवार यांना 2 लाख 33 हजार 157, वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील यांना 30 हजार 716 मते मिळाली आहेत. 7 हजार 94 मते नोटाला मिळाली आहेत.

टपाली मतदान वगळता पहिल्या फेरीपासून श्रीरंग बारणे आघाडीवर असल्याचे पहायला मिळत आहे. त्यांची लाखाची आघाडी मोडीत काढणे पार्थ पवार यांच्यासाठी आव्हान ठरत आहे. वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळत आहेत. तर नोटाला चौथ्या क्रमांकाची मते मिळत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.