बारटक्के चौकातील खड्डा तातडीने बुजविला

सातारा – सातारा शहरातील विविध भागात पाणी गळती तसेच इतर कामासांठी खणलेल्या खड्ड्यांमुळे अपघात घडून नागरिकांच्या जीवीतास धोका निर्माण झाल्याचे वृत्त दै प्रभातने प्रसिद्ध केले होते. सातारा नगरपरिषदेने या वृत्ताची दखल घेऊन बारटक्के चौकातील अपघाताला निमंत्रण देणारा खड्डा तातडीने मुजवला. अद्याप एक ते दोन दिवस येथील गटाराचे कामकाज सुरू राहणार असल्याची माहिती आहे. नळ कनेक्‍शन तपासणी तसेच गळती आदी कामांकरिता हा खड्डा खणला होता. रात्रीच्या वेळी एसटी स्टॅंडकडून येणाऱ्याअथवा राधिका टॉकिज कडून जाणाऱ्या वाहनांचा या ठिकाणी अपघानाची शक्‍यता होती.

यामुळे वाहतुकीची कोंडी देखील होत होती. खड्डा मुजवल्यामुळे पेठेतील नागरिकांनी दै प्रभातचे आभार मानले व अभिनंदन केले. सातारा नगरपरिषद तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यातीने कायमच शहरातील विविध भागांमधील नागरिकांच्या उदभवणाऱ्या समस्याकरिता रस्त्याची खोदाई करण्यात येते. मात्र बहुतांश ठिकाणी खणलेले खड्डे जैसे थे परिस्थितीत पहायला मिळतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यामुळे रात्रीच्या वेळी अथवा दिवसा देखील अपघात घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सातारा शहरात ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे शहरातील प्रमुख रस्त्यासोबत अंतर्गत रसत्यांवर देखील ताण येत आहे. त्यात शहरातील नळ कनेकशन, गटारांचे काम करत असताना रस्ते खोदाई करावी लागत आहे. यामध्ये वाहतूक व्यवस्था बिघडत असून नागरिकांची गैरसोय होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)