बायोमॅट्रीक हजेरीची तपासणी करा

मनविसेचा शिक्षणाधिकाऱ्यांना इशारा : इंटिग्रेटेड कॉलेजवर वचक बसणार कधी?
पुणे – क्‍लासेस आणि महाविद्यालयांचे टायअप बंद करण्याच्या हेतूने सुरू करण्यात येणारी बायोमॅट्रीक हजेरी अद्यापही अनेक महाविद्यालयांत सुरूच झालेली नाही. याबाबत अंमलबजावणीसाठी एक महिन्याची दिलेली मुदत उलटली आहे. त्यामुळेच बायोमॅट्रीक हजेरीची तपासणी करा अन्यथा मनसे स्टाईटी आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष कल्पेश यादव यांनी शिक्षणाधिकारी गणपत मोरे यांना दिला.
राज्यात अनेक ठिकाणी महाविद्यालयांनी क्‍लासेसशी टायअप करून इंटिग्रेटेड कोर्सेस सुरू केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना आयआयटी, जेईई, सीईटी यासारख्या परीक्षांची तयारी करायची असते त्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात रोज हजेरी लावणे शक्‍य होत नाही. मात्र त्यांना बाहेरुन परीक्षा देण्याचा शेराही स्वत:च्या गुणपत्रिकेवर नको असतो. अशा विद्यार्थ्यांसाठी भरमसाठ पैसे घेत काही महाविद्यालयांनी हजेरीसाठी क्‍लासेसशी टायअप केले आहे. नियमानुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालयात 75 टक्‍के हजेरी असणे गरजेचे आहे. मात्र विद्यार्थ्यांना ती हजेरी भरणे शक्‍य नसते. अशावेळी काही महाविद्यालये पैसे घेत ही हजेरी पूर्ण भरून घेतात. तसेच काही महाविद्यालये प्रात्यक्षिक परीक्षेचे गुणही परीक्षा न घेताच देतात. विज्ञान शाखेत हा प्रकार सर्वांधीक आढळून येतो. अखेर 15 जून 2018 रोजी शासनाने इयत्ता अकरावी-बारावीच्या विज्ञान शाखेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी अनिवार्य केली आहे. याची अंमलबजावणी पुढील एक महिन्याच्या आत कनिष्ठ महाविद्यालयांनी करणे गरजेचे असल्याचे नमूद केले होते. मात्र दीड महिन्यानंतरही अनेक महाविद्यालयांनी बायोमॅट्रीक हजेरी सुरू केलेली नाही. याबाबत मनविसेने शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहून शासनाला सादर केलेल्या अहवालाची प्रत द्या अशी मागणी केली आहे. तसेच बायोमॅट्रीक यंत्रणा न बसविणाऱ्या महाविद्यालयांची नावे जाहीर करा असेही मनविसेकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान याबाबत विचारणा करण्यासाठी मोरे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)