नवी दिल्ली :काही महिन्यांपूर्वी तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर भारतीय फुटबॉल टीमचा माजी कर्णधार बायच्युंग भूतिया सिक्कीममध्ये स्वतःचा राजकीय पक्ष स्थापना करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे. हा प्रादेशिक पक्ष असून सिक्किमच्या हितासाठी काम करणार आहे. तसेच उद्या भूतिया आपल्या नविन पक्षाची घोषणा करणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
मी गुरुवारी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधत माझी पुढची वाटचाल जाहीर करणार आहे. सिक्कीम नव्या बदलासाठी तयार आहे हे मला राष्ट्रीय प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवायचं आहे असं बायच्युंग भूतियाने ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे. २६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता होणाऱ्या फेसबुक लाईव्हमध्ये सर्वांनी सहभागी व्हा असे आवाहन बायच्युंग भूतियाने केले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा