बाबुमियॉं फरास यांचेवर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार

सातारा  – सातारा जिल्ह्यातील जेष्ठ आझाद हिंद सैनिक व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सहकारी इब्राहिम उमर ऊर्फ बाबुमियॉं फरास यांच्या पार्थिवावर सातारा येथील गेंडामाळ कब्रस्तान मध्ये संपूर्ण शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार (दफनविधी) करण्यात आला. त्यांना बंदुकीच्या फैरी झाडुन पोलीस दलाने बिगुलाची शोकधुन वाजवुन मानवंदना दिली.
काल रात्री बाबुमियॉं फरास यांचे वृद्धापकाळाने सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच समाजातील सर्वच थरातील नागरिकांनी त्यांच्या शनिवार माची येथील शाहूकृपा या निवासस्थानी अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. अंत्यदर्शन घेणाऱ्यांमध्ये राजघराण्यातील श्री. छ. शिवाजीराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, विक्रमराजे भोसले, अक्कामहाराज, तसेच माजी ऊपनगराध्यक्ष अमोल मोहिते, सुधीर धुमाळ, शकिल बागवान, प्रकाश बडेकर, यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सकाळी 10 वाजता सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या नेत्रुत्वाखालील पोलिसांनी माची पेठ येथे शोकधुन वाजवुन मानवंदना दिली. सारंगकर यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून पार्थिवावर तिरंगा ध्वज लपेटला. त्यानंतर अंत्ययात्रा सुरू झाली. अंत्ययात्रा गेंडामाळ कब्रस्तान मध्ये पोचल्यावर तेथे तहसीलदार यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर शाहुपुरी पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ , पो. नि. बेंदरे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर पोलीस दलाने मानवंदना दिली. बंदुकीच्या तिन फैरी झाडल्या. पोलिसांनी पार्थिवावरील तिरंगा ध्वज बाबुमियॉं फरास यांच्या कुटुबियांकडे सुपुर्द केला. हा ध्वज कुटुंबियांच्या तर्फे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्विकारला. बाबुमियॉं विषयी माहिती विजय मांडके यांनी दिली. त्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बाबुमियॉंच्या कार्याचे महत्व सांगितले आणि राजघराण्याशी फरास कुटुंबियांचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध यापुढे सुध्दा कायम राहतील असे सांगितले. त्यानंतर या आझाद हिंद सैनिकाला शांत उभे राहून सर्वांनी आदरांजली वाहिली.

या वेळी अच्युतराव जाधव प्रकाश बडेकर, अस्लम तडसरकर, विजय निकम, शिरिष जंगम, फिरोज पठाण, रफिक बागवान, दत्तात्रय कारंडे आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)