बाजार लहानग्यांचा अन्‌ खरेदी मोठ्यांची

हनुमानागिरी हायस्कुलमधील चिमुकल्यांचा बाजार उत्साहात

पुसेगाव – श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या हनुमानगिरी हायस्कुल पुसेगाव, ता. खटाव येथे बालबाजार भरवण्यात आला. बाजार लहानग्यांचा आणि खरेदी मोठ्यांची होती. या बाल बाजारात विद्यार्थ्यांनी पालेभाज्या, भेळ, पाणीपुरी, शेंगा, कांदा, खेळणी, स्टेशनरी साहित्याची दुकाने थाटली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बाजाराचे उद्‌घाटन संस्थेचे अध्यक्ष विश्‍वनाथ जाधव, सचिव डॉ. सुरेश जाधव, सदस्य मोहनराव जाधव, प्राचार्य डी. पी. शिंदे, पर्यवेक्षक श्रीधर जाधव, मोहन गुरव, सर्व शिक्षक, पालक-शिक्षक उपस्थित होते. गावातील महिलांनी खरेदीचा आनंद घेतला. ग्रामस्थांनी व पालकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे बाजार गजबजलेला होता. लहान मुलांना आर्थिक गणित समजणे गरजेचे आहे. तसेच त्यांना अभ्यासाबरोबर व्यावहारिक ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढील काळात कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जाताना कमीपणा भासत नाही. तसेच शाळेने जिल्हयातील शाळेसमोर नवा आदर्श ठेवला आहे. जिल्ह्यातील शाळांनी असा नवीन प्रयोग करावा, असे आवाहन सचिव डॉ. सुरेश जाधव यांनी केले.

बाल बाजार उपक्रमामुळे सर्व मुलांच्या व्यवहार ज्ञानात भर पडेल. अशा उपक्रमामुळे पालकवर्गही शाळेत येऊ आहेत. अशा उपक्रमांतून शाळेच्या प्रगतीचा आलेख उंच जात राहिल, असा विश्‍वास अध्यक्ष विश्‍वनाथ जाधव यांनी व्यक्त केला. सर्व मुला-मुलांनी स्वतःच्या घरी पिकणाऱ्या पालेभाज्या, केळी, कांदे, शेंगा, अशा निवड वस्तू आणल्यामुळे बाजारात सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधले होते. समाज संपर्क शेती व शेतकरी यांच्याविषयी प्रेम वाढावे व स्वतः अर्थार्जन करावे, हा उद्देश या आयोजनातून साध्य झाला असल्याचे प्राचार्य डी .पी. शिंदे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)