बाजारातील घुसळण अपरिहार्य, उरेल ते बावनकशी (भाग-2)

बाजारातील घुसळण अपरिहार्य, उरेल ते बावनकशी (भाग-1)

तिसरे कारण म्हणजे भारतीय कॉर्पोरेट्सची कमकुवत वाढ आणि नफ्यांचे आकडे. जिकडं तिकडं व्यवसायाबद्दलच्या वाईटच बातम्या समोर येत आहेत. वाहन उद्योगातील दिग्गजांना हे क्षेत्र आतापर्यंतच्या सर्वात खोल व दीर्घ मंदीच्या कचाट्यात सापडल्यासारखं भासू लागलंय. फार्मा उद्योगामध्ये बनावट गुणवत्ता आणि शुद्धतेच्या प्रवृत्तीमुळे उद्भवणाऱ्या समस्यांचा एक वेगळाच प्रकार आहे, जी एक नैतिक त्रुटी असून त्याचं निराकरण करणं हेआर्थिक मंदीपेक्षा कठीण ठरू पाहतंय आणि ज्यामुळं अमेरिकन एफडीएनं भारतीय कंपन्यांच्या नाकी नऊ आणलेले आहेत.दूरसंचार उद्योग, मोठ्या प्रमाणात सेवा पुरवण्यासाठी किती खर्च येतो आणि प्रत्यक्षात भारतीय जनता त्यासाठी किती पैसे मोजू शकते या मूलभूत समस्यांमध्ये चाचपडताना दिसत आहे. बँकांसाठी, सध्या परिस्थिती अशी आहे की वाटलेली कर्जं जितकी कमी तितकं चांगलं असं म्हणण्याची वेळ आलीय. एनबीएफसींची कथा आपल्या सर्वांनाच माहित आहे.

आतापर्यंत आपण लेहमनमुळं निर्माण झालेली गर्ता अनुभवली, कच्च्या तेलातील तेजी अनुभवली त्यामुळं अशा गोष्टी या जगभरात घडत असतात आणि माझ्या मते, जसजसे कंपन्यांचे निकाल सुधारू लागतील, अर्थव्यवस्था गती धरेल तेंव्हा आपला बाजार देखील अशा बाह्य गोष्टींचा फारसा बाऊ करणं ही अनेकप्रकारे चांगलीच आहेत. लोक (कंपन्यांचे की-पर्सन्स), व्यवसाय, त्यामागील कल्पना, व्यवस्थापन, पैशांचा योग्य विनिमय इ. बाबींची टेस्ट होऊन, खरोखर जे बावनकशी उरेल त्याची टेस्ट जिभेवर दीर्घकाळ रेंगाळण्यासाठी काय चांगले आहे तेवढंच निवडण्याची संधी, यापेक्षाचांगल्याप्रकारे कधीच मिळत नसते, गरज आहे थोडं पाण्यात उतरण्याची. २००१-२००२ च्या सुमारास असंच घडलं. सेन्सेक्स २६०० अंशांवरून पुढच्याच वर्षी ३७५० झाला (४४% वाढ), व नंतरच्या सहाच वर्षात तो २१२०० म्हणजे सुमारे आठपट वाढला. आता अगदी इथून पुढं २० टक्के खालच्या पातळीवरून म्हणजे ३०००० वरून आठपट म्हणजे सेन्सेक्स २४०००० ह्या पातळीवर कधी जाणार याचं उत्तर आताच्याच मंदीत दडलंय.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)