बांबूपासून बनल्या पर्यावरणपूरक इमारती

कोणत्याही इमारतीचे बांधकाम करताना वापरण्यात येणारे बांबू हे बांधीव आणि हलक्‍या वजनाचे असतात. कॉंक्रिटला आधार देण्यासाठी वापरण्यात येणारे हे बांधकाम साहित्य हे पर्यावरणपूरक मानले जाते. यापूर्वीच्या तुलनेत बांबूंची जगात तिप्पटीने मागणी वाढली आहे. त्यामुळे बांधकाम निर्मिती क्षेत्रात उपयुक्त साहित्य म्हणून ओळखले जाते. दक्षिण अमेरिका, दक्षिण-पूर्व आशिया या भागात बाबूंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. पूल आणि घराच्या निर्मितीसाठी बांबूचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे.

जगात अनेक आलिशान थिएटर आहेत जेथे चित्रपट, नाटक, नृत्य आणि मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले जातात. मात्र हॉंगकॉंगमध्ये काही आठवड्यांसाठी अनोख्या पद्धतीचे थिएटर उभारले जाते. हे थिएटर कलागुणांच्या व्यासपीठाबरोबरच भोजनावळीचे ठिकाणही बनले आहे. जगातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेल्या बेटापैकी अप ले चाऊ येथे बांबूपासून थिएटर तयार केले जाते. यावर्षी 81 फूट उंच, 130 फूट लांब आणि 45 फूट रुंदीचा हा रंगमच दक्षिण हॉंगकॉंगमध्ये देवी हुंग शिंगचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी तयार केला जात आहे. बाबूंचे थिएटर अनोख्या पद्धतीने तयार केले आहे. त्याचा साचा ठरलेला नसतो.

कामगारांच्या मते, आपला अनुभव, बुद्धी आणि एकमेकांच्या ताळमेळातून हे थिएटर उभारले जाते. हे एक स्मार्ट कंस्ट्रक्‍शन सिस्टिम असून इको फ्रेंडली आहे. ही एक मानवी कलेचा अदभूत नमुना मानला जातो आणि तो मोठ्या उत्साहाने साकारण्यात येतो. मात्र अशा प्रकारच्या बाबूंच्या थिएटरच्या भवितव्यावरून प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. कारण युवकांना अशा प्रकारची कला शिकण्यात रस राहिलेला नाही.

बांबूचे सौंदर्य
अप ले चाऊ प्रकल्पाशी निगडीत असलेले चान यक वोंग यांच्या मते, अशा प्रकारची कला केवळ शंभर जणांनाच ठाऊक आहे. ते गेल्या तीस वर्षांपासून बाबूंपासून थिएटर निर्मिती करण्याचे काम करत आहेत. मात्र युवकांना अशा प्रकारच्या कलेत रस नसल्याचे दिसून येते. चान आता 60 वर्षाचे असून त्यांनी वयाच्या 13 व्या वर्षी आपल्या आजोबाकडून ही कला शिकली होती. त्यांचे आजोबा दक्षिण चीनच्या गुआंगडोंगमध्ये राहतात. हॉंगकॉंगची कंपनी सीएलथ्रीचे मालक विलियम लिम यांच्या मते, बांबू थिएटर तयार करण्यासाठी प्रत्येक वर्षी 50 लाख छड्यांचा वापर करावा लागतो. मेटल स्केफोल्डिंगचे काम इथे प्रत्येक ठिकाणी दिसेल. ही एक कला आहे. कोणतीही सुरक्षा नसताना ही मंडळी बाबूंपासून कलाकृती उभी करतात. जगभरात बाबूंपासून अनेक ठिकाणी इमारती उभ्या केल्या जात आहेत की, त्या पर्यावरणपूरकबरोबरच सिमेंटच्या जंगलात आपली उपयुक्ततता सिद्ध करत आहेत.

वाइंड आणि वॉटर बार: बांबूच्या अधिक उत्पादनामुळे व्हियतनामचे लोक बांबूचा विविध प्रकारे उपयोग करतात. या श्रेणीत वाइंड आणि वॉटर बारची निर्मिती करण्यात आली आहे. 2008 मध्ये वॉंग त्रोंग निगिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन बांबूपासून वॉटर बार तयार केला. वैशिष्ट्यपूर्ण इमारतीमुळे 2008 मध्ये इंटरनॅशनल आर्किटेक्‍चर पुरस्कारही मिळाला आहे. तीन महिन्यात तयार झालेल्या इमारतीला 2011 मध्ये अरकासियाकडून गोल्ड मेडल मिळाले होते. वॉटर बारसाठी सात हजार बांबू ट्रीचा उपयोग केला होता. या कॅफेत कृत्रिम झरा असून तो झरा बारकाईने पाहिल्यास लक्षात येतो.

बांबू फ्लोटिंग हाऊस: यूनिक डिझाइन आणि लो कॉस्टमुळे बांबू हाऊसने 2015 मध्ये ग्रीन गूड डिझाईनचा पुरस्कार पटकावला होता. या हाऊसला व्हियतनामच्या एका कंपनीने साकारले. आठ ते दहा सेंटिमीटर बांबू कॅनची घट्ट बांधणीतून तयार केलेला हे घर आहे. या घरासाठी बाबूंची जाळी आणि नारळाच्या पानांचा उपयोग केला आहे.या घराचे वैशिष्ट्‌ये म्हणजे पूरातही हे घर टिकून राहते. व्हियतनाममध्ये सतत पूराचे सावट असते. अशा स्थितीत अशा प्रकारचे घर हे पर्यावरणपूक आहेच त्याचबरोबर संकटापासूनही बचाव करते. नैसर्गिक प्रकाश आणि उत्तम हवा यामुळे बांबू फ्लोटिंग हाऊस लोकप्रिय ठरले आहे.

ट्रेंग बॅंग बांबू हाऊस: 2014 मध्ये व्हियतनामच्या के ता नीह प्रांतात ट्रॅंग बॅंग बांबू हाऊसला नैसर्गिक साधनाचा उपयोग केल्याने आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. हे घर लाकूड आणि बांबूपासून तयार केले असून त्याचे छत नारळाच्या पानापासून तयार केले आहे. 2008 मध्ये घर तयार करण्यास सुरवात झाली होती आणि त्याला दोन वर्षाचा कालावधी लागला. या घराजवळच शेती असून जी मंडळी निसर्गावर प्रेम करतात त्यांच्यासाठी हे घर ड्रिम हाऊस आहे. अशा प्रकारचे घर खरेदी करायचे असेल तर खरेदीदाराची मुलाखत घेतली जाते. तो किती पर्यावरणवादी आहे, याची चाचपणी मुलाखतीतून केली जाते.

बांबू विंग रेस्टॉरंट, दाय लाय
पाण्यातून आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांपासून प्रेरणा घेत बांबू विंग रेस्टॉरंटची निर्मिती झाली. 2009 मध्ये या रेस्टॉरंटची बांधणी झाली. बारा मीटरच्या या बांबूच्या बांधकामात एक झरा असून ते परिसराला थंडावा देण्याचे काम करते. म्हणून इथे वातानुकुलीत यंत्रणेची गरज भासत नाही. या रेस्टॉरंटने अनेक प्रकारचे पुरस्कार पटकावले आहेत. त्यात 2012 च्या ग्रीन आर्किटेक्‍चरच्या पुरस्काराचा देखील समावेश होता. याठिकाणी लग्न, संगीत, कॉन्सर्ट, मनोरंजन कार्यक्रम आदींचे आयोजन केले जाते. या हॉलच्या छताचा आकार पक्ष्याच्या पंख्याप्रमाणे असून तो बाहेरची थंड हवा आतमध्ये येण्यास हातभार लावते. यातून पारंपारिक ऊर्जा स्त्रोतचा भरपूर वापर होतो आणि वीजबिलात मोठी बचत होते. बांबू रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात आल्याची प्रचिती येते.

अपर्णा देवकर 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)