बांधकाम विभागातील रजिस्टरची चोरी

सातारा,दि.27 –
सातारा जिल्हा बांधकाम विभागाच्या सातारा कार्यालयातील स्टोअरचा दरवाजा तोडून रजिस्टरची चोरी झाली.याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.मिलींद रंगराव काटकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
बुधवार दि. 19 रोजी कार्यालय बंद करून सर्व कर्मचारी गेले होते. त्यानंतर दि.20 रोजी कार्यालयाला सुट्टी असल्याने कार्यालयात कोणीही फिरकले नव्हते. दि.21 रोजी सकाळी दहा वाजता कार्यालयातील शिपाई स्टोअर रूममध्ये फाईल आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी स्टोअर रूमचा दरवाजा उघडा असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने ही घटना तात्काळ वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पाहणी केली असता कार्यालयाला लागणारी विविध रजिस्टर नसल्याचे लक्षात आले. एकूण 1 हजार सहाशे रुपयाची रजिस्टर चोरीला गेल्याची फिर्याद लिपीक मिलींद रंगराव काटकर यांनी दिली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)