बांधकाम मजूर जगताहेत वंचितांचे जीणे

पिंपरी – परप्रांतातून पोटाची खळगी भरण्यासाठी शहरात आलेल्या बांधकाम मजुरांना वंचितांचे जीणे जगण्याची वेळ आली आहे.

विविध सुविधांचा अभाव, अस्वच्छतेच्या विळख्यात सापडल्याने त्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. शहरातील रहाटणी परिसरातील तापकीर मळा चौकाशेजारी चार भिंतीच्या चौकटीमधील मोकळ्या जागेत जनावर कोंडावी, अशा पद्धतीने परप्रांतातून आलेले 40 ते 50 जण मुला-बाळांसोबत राहत आहेत. वास्तविक इतरांसाठी निवारा उभारणारे हे मजूर मोकळ्या जागेत पत्र्याच्या शेडमध्ये राहत आहेत. या ठिकाणी त्यांना कुठल्याच सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांना हलाखीचे जीवन व्यथीत करावे लागत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पावसाळा असल्यामुळे त्यांना आस्मानी संकटाशी दोन हात करण्याची वेळ आली आहे. पावसाचे पाणी पत्र्याच्या शेडमध्ये शिरते. त्यामुळे रात्रीची झोप सुद्धा त्यांना मिळत नाही. त्या परिसरात सगळीकडे गवत आणि पाणी साचल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डेंगूची लागण होण्याची शक्‍यता नाकारता नाही. त्याचबरोबर पावसामुळे परिसरात सर्वत्र चिखल झाल्याने मजुरांना वाट काढणे कठीण झाले आहे. या ठिकाणी मजुरांना दिलेल्या स्वच्छता गृहात घाणीचे साम्राज्य आहे, तरी नाईलाजाने त्यांना त्याचाच वापर करावा लागतो आहे. अंघोळीसाठी न्हाणी घर नसल्याने उघड्यावरच आंघोळ उरकावी लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याखेरीज त्यांच्यापुढे पर्याय नाही.

बांधकाम मजुरांच्या प्रश्‍नाकडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही. इतरांचे घरकुल उभारणाऱ्या कामगारांना हक्‍काचे घर नाही. ते ज्या ठिकाणी राहतात, तेथे कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाही. स्वच्छतेकडे देखील दुर्लक्ष केले जाते. शहरातील एक महत्त्वाचा घटक असूनही महापालिका प्रशासनच नव्हे, तर लोकप्रतिनिधी देखील बांधकाम मजुरांचा प्रश्‍न गांभिर्याने घेत नाही.
– सचिन जाधव, अध्यक्ष, हेल्पिंग हॅण्ड फाउंडेशन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)