बांधकाम कामगारांसाठी सर्वरोग निदान शिबीर

पिंपरी – किवळे येथील मुकाई चौकातील सर्व्हे क्रमांक 40 मधील लोटस लक्ष्मी येथे बांधकाम कामगारांसाठी सर्वरोग निदान शिबीर घेण्यात आले. यामध्ये 115 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

रुग्णांना मोफत औषधे आणि विविध आजारांबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबतची माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र राज्य आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीर घेण्यात आले. माजी महापौर योगेश बहल, लोटस ग्रुपचे संचालक संतोष कर्नावट, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. सुनील जॉन, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सूर्यवंशी, पुनावळे येथील प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ठोणे, बालरोग तज्ज्ञ डॉ. क्षिरसागर, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. जी. सांगडे, डॉ. अमित माने आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लहान मुलांचे लसीकरण, गरोदर मातांची नावनोंदणी व तपासणी, धनुर्वात लसीकरणही तसेच रक्तदाब, मधुमेह, जनरल तपासणी, बालरोग तपासणी, कर्करोग, स्त्रीरोग, त्वचारोग, हिवताप, मलेरिया, कुष्ठरोग, क्षयरोग, संसर्गजन्य आदी तपासण्याही या शिबिरात करण्यात आल्या. डेंग्यू आणि स्वाईन फ्लूबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)