बहुवैविध्य आणि नियमानुसार कारभाराला भारताची बांधिलकी

“ब्रिक्‍स’ परिषदेमध्ये मोदी यांचे प्रतिपदन

जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) – बहुविविधतेचा समावेश, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि नियमांवर आधारित जगासाठी भारत कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “ब्रिक्‍स’ परिषदेमध्ये केले. आफ्रिकेतील चार देशांच्या दौऱ्यादरम्यान काल ते दक्षिण आफ्रिकेत दाखल झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“ब्रिक्‍स’ परिषदेच्या उद्‌घाटनाच्यावेळी सर्व उपस्थित नेत्यांबरोबर मोदी सहभागी झाले होते. त्याची क्षणचित्र ट्‌विटरवर प्रसिद्धीस देताना शांतता, सौहार्द, विकास आणि समृद्धीमधील सहभाग या हेतूंसाठी अस्तित्वात आलेल्या “ब्रिक्‍स’ संघटनेला दहाव्या वर्षाला सुरूवात होत असल्याचा उल्लेखही त्यांनी आपल्या ट्‌विटर संदेशामध्ये केला. ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांची “ब्रिक्‍स’ संघटना 2010 साली स्थापन झाली होती.

भारताला चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये “ब्रिक्‍स’ देशांबरोबर काम करायचे आहे. त्यासाठी धोरण निश्‍चितीमध्ये आणि सर्वोत्तम कार्यातही योगदान द्यायचे आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. 18 व्या शतकापासून सुरु झालेल्या औद्योगिक क्रांतीच्या चौथ्या टप्प्यामध्ये तंत्रज्ञानाचा संमिश्र आविष्कार आहे. भौतिक, डिजीटल आणि जीवशास्त्रीय तंत्रज्ञानाच्या सीमा धूसर होत जातात. या औद्योगिक प्रगतीचा संदर्भ मोदींनी आपल्या भाषणात दिला. तंत्रज्ञानातील नाविन्यामुळे उत्पादकता, अधिक चांगल्या सेवासाठी भारताला “ब्रिक्‍स’देशांबरोबर सहभागी व्हायचे आहे.

सामाजिक सुरक्षा आणि सरकारी योजनांचा निधी लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचवण्याचे तंत्रज्ञान ही प्रमुख उदाहरणे असलेल्या चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये कायद्याची अंमलबजावणी प्रामुख्याने अभिप्रेत आहे. या चौथ्या औद्योगिकी क्रांतीला भांडवलापेक्षाही अधिक महत्व असेल. यामधील रोजगार कुशल पण तात्पुरत्या कामाशी संबंधित असेल. औद्योगिक उत्पादन, डिजाईन आणि निर्मिती क्षेत्रामध्ये मोठ्याप्रमाणावर फेरबदल होणार आहेत, असेही मोदी म्हणाले. शाळा आणि विद्यापिठांनी भविष्यातील युवकांसाठी अभ्यासक्रमांची रचना करावी, यावरही त्यांनी भर दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)