बहुतांश नागरी विमान वाहतूक कंपन्यांची आर्थिक स्थिती डबघाईला

महाग इंधन आणि वाढलेल्या स्पर्धेचा परिणाम

नवी दिल्ली, दि. 29-केवळ सरकारी एअर इंडिया नाही तर खासगी विमान वाहतूक कंपन्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक होत चालली आहे. या अगोदर किंगफिशरसह काही कंपन्या बंद पडल्या आहेत. आता इतरही काही कंपन्यांची आर्थिक परिस्थिती बिघडत चालली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारला या विषयात लक्ष घालावे लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देशात विमान प्रवाशांची संख्या कमालीची वाढली असली तरीही विमान कंपन्या तोट्यातच चालल्या आहेत. त्यातच विदेशातील मोठमोठ्या कंपन्याही भारतात व्यवसाय करण्यास उत्सुक आहेत. इंधन दरवाढ, स्पर्धेमुळे कमी झालेले भाडे आदी कारणांमुळे विमान कंपन्यांची हालत नाजूक बनत चालली आहे.

यातून शक्‍य तितक्‍या लवकर मार्ग निघाला नाही तर बऱ्याच कंपन्याची परिस्थिती बिघडण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. काही नव्या कंपन्यांचा अपवाद वगळला तर इतर कंपन्यांवर कर्जाचे ओझे वाढत चाले आहे. त्यासाठी मोठे व्याज द्यावे लागते.

जेट एअरवेजचे उदाहरण घ्यायचे झाल्यास 1990 मध्ये हवाई क्षेत्र खुले झाल्यानंतर पहिली कंपनी स्थापन झाली ती हीच. परंतु आज या कंपनीही आर्थिक स्थिती ढासळलेली आहे. आता पीहल्या तिमाहीमध्ये कंपनीला 1326 कोटींचा निव्वळ तोटा झाला आहे. मागील वर्षी हीच कंपनी 58 कोटींचा फायदा झाला होता. आज कंपनीकडे पैशांची तंगी असल्याने स्टॉक सारखे घसरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार कंपनीवर नाराज आहेत.

या अगोदर कंपनीने कर्मचाऱ्यांचे पगार थेट 25 टक्‍क्‍यांनी कमी करण्याचा इशारा दिला होता. त्याबरोबर कंपनीने वेळेवर ताळेबंद जाहीर केला नाही. या कारणामुळे शेअरबाजाराबरोबरच सरकारही या कंपनीच्या कामकाजाचा आढावा घेत असल्याचे बोलले जात आहे.

या कंपनीवर आलेल्या आर्थिक संकटाला मुख्यत: भाडेदराचे भडकलेले युद्ध मानले जात आहे. केंद्र सरकारने परदेशी कंपन्यांना भारतीय हवाई क्षेत्रामध्ये सेवा पुरविण्यास संमती दिल्याने मलेशियाच्या एअर एशिया आणि सिंगापूर एअरलाईन्ससारख्या बजेट विमान कंपन्यांनी भारतीय कंपन्यांचे कंबरडेच मोडले आहे. दुसरे मोठे कारण म्हणजे इंधनाचे वाढलेले दर आणि कर. तेलावर 30 टक्के स्थानिक कर लावला जात असल्याने तेलाच्या किमतीच आकाशाला भिडलेल्या आहेत. भारतात जेट फ्युएलची किंमत सर्वाधिक आहे. ती कमी असावी असे विमान कंपन्याना वाटते. त्यांनी तशी मागणी सरकारकडे वेळोवेळी केलेली आहे.

भारतीय कंपन्यांसाठी 1994 पासूनच वाईट काळ सुरू झाला होता. 1994 मध्येच सरकारने परदेशी विमान कंपन्यांना भारतीय बाजारात उतरण्याची परवानगी दिली होती. यानंतर 2012 मध्ये किंगफिशर एअरलाईन्स तोट्यात जाऊन बंद झाली. यानंतर गो इंडिगो सोडल्यास अन्य 9 भारतीय कंपन्या तोट्यातच जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)