सातारा : राखीचा धागा कायम स्मरणात राहील

पोलिसांनी व्यक्त केली भावना; दै.प्रभातच्या राखी विथ खाकीचे कौतुक

बहिण भावाच्या प्रेमाच्या नात्याचा धागा भक्कम करणाऱ्या रक्षाबंधनाला साताऱ्यात संवेदनशिलतेची किनार लाभली. सातारकरांची सुरक्षा सांभाळणाऱ्या पोलिसांसाठी यंदाची राखी पोर्णिमा खऱ्या अर्थाने स्मरणीय ठरली. निमित्त होते दै.प्रभातच्या “राखी विथ खाकी’ या उपक्रमाचे. सामाजातील अनेक घटक पोलिसांना राखी बांधून आपली बांधीलकी जपत असतात. यंदा मात्र दै.प्रभातने हा उपक्रम राबवल्याने पोलिस आणि माध्यमे यांच्यातील नाते अधिक दृढ झाल्याची भावना पोलिसांनी व्यक्त केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कुटुंबातील आई-वडील, भाऊ, बहीण गावी असल्यास तेथे जाणे पोलिसांना शक्‍य होत नाही. त्याचा विचार करून दै.प्रभातने व शहरातील युवतींनी शहरात विविध ठिकाणी नोकरी करत असलेल्या पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. यावेळी   पोलिस मित्र प्रिया साबळे, आलिशा मुल्ला,आस्मा मुल्ला, प्राजक्त जाधव, कोमल बागल या युवतींनी पोलिसांना राख्या बांधल्या.

युवती राखी बांधताना भावनावश झालेल्या पोलिसांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. सातारा पोलीस दलातील पोलिसांना साताऱ्यातील युवतींनी राखी बांधून अनोखी राखी पौर्णिमा (रक्षा बंधन) साजरी केली.

नागरिकांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असणाऱ्या पोलिसांना कोणत्याच सणाला सुट्टी नसते.त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या मानसकितेवर होऊ नये म्हणून पोलिसांना राखी बांधणाऱ्या युवतींना महिला-भगिनींचे सदैव रक्षण करण्याचा संकल्प करून पोलिसांनी भावाची बहिणीला अनोळखी ओवाळणी सुध्दा दिली.

यावेळी शहरातील विविध ठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना राखी बांधण्यात आली.दै.प्रभातने राबवलेल्या राखी विथ खाकी या उपक्रमाचे जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख,अप्पर अधीक्षक विजय पवार,उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राजमाने,सातारा शहरचे पो.नि. नारायण सारंगकर,शाहूपुरीचे किशोर धुमाळ,सातारा तालुकाचे प्रदीप जाधव यांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)