बहिणीला छेडले म्हणून केला खून ; अल्पवयीन मुलगा ताब्यात

बहिणीला छेडले म्हणून केला खून ; अल्पवयीन मुलगा ताब्यात

पुणे,दि.29- डहाणूकर कॉलनीतील लक्ष्मी नगरमध्ये सोमवारी रात्री एका तरुणाचा कोयत्याने वार करून निर्घुन खून करण्यात आला होता . याप्रकरणी खून करणाऱ्या अल्पवयीन मुलाला गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने 24 तासात ताब्यात घेतले आहे. बहिणीची वारंवार छेड काढल्याने हा खून करण्यात आल्याचे आरोपीने कबुल केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सिद्धप्पा जटप्पा कलवंडी(25, रा.लक्ष्मीनरग) असे खून झालेल्याचे नाव आहे.

सिद्धप्पा कलवंडी व आरोपी हे दोघे एकाच परिसरात राहण्यास आहेत. सिद्धप्पा याचे आरोपीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. तसेच तो वारंवार आरोपीच्या बहिणीस फोनवरुन संपर्क साधत होता. त्यामुळे दोघांच्या कुटूंबामध्ये भांडण झाले होते. यानंतरही मयत संबंधीत मुलीशी संपकार्त होता. दरम्यान काल रात्री सिद्धप्पा हा लक्ष्मी नगरमध्ये रस्त्यावर उभा होता. त्यावेळी आरोपीने त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करुन खून केला.यानंतर तो घटनास्थळावरुन पळून गेला. दरम्यान अलंकार पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेकडून प्रकरणाचा समांतर तपास करण्यात येत होता. यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सुनिल पवार यांना आरोपी सिंहगड रस्त्यावरील मॅकडोनाल्ड येथे येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता, तो बहिणीची छेड काढतो व सारखा बहिणीस छेडतो म्हणून खून केल्याची कबूली दिली. आरोपीला अलंकार पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, पोलीस निरीक्षक अंजुमन बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अश्‍विनी जगताप, कर्मचारी सुनिल पवार, शंकर संपते, विशाल शिर्के, सचिन ढवळे, निलेश शिवतरे, रमेश चौधर, रमेश साबळे, शितल शिंदे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)