बस चालकाचे प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली: पाच जखमी

मेढा- मेढा-सातारा मार्गावर बिभवी गावानजीक एका सायकलस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एस. टी. बस चालकाचा ताबा सुटून बस रस्ता सोडून खाली गेल्याने झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाले. यामध्ये एका दुचाकी स्वाराचा समावेश आहे. रस्त्याशेजारी असलेल्या एका विहिरी नजीक बस गेली. चालकाने प्रसंगावधान राखून बस बाजूला वळवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

सकाळी अकराच्याच्या सुमारास मेढा आगाराची बस साताऱ्याकडे निघाली होती . यावेळी गाडीत सुमारे 40 प्रवासी होते, ही बस बिभवी गावानजीक आली असता एक सायकलस्वार अचानक बस समोर आल्याने बसचालकाने त्याला वाचवण्यासाठी ब्रेक दाबला. त्यामुळे गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात गेली. समोर असलेल्या एका विहिरी नजीक जात असताना प्रसंगावधान राखून बसचालकाने गाडी वळवली त्यामुळे पुढील दुर्घटना टळली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी साताऱ्याहून मेढा येथे दुचाकीवरून जाणारे मेढा नगर पंचायतीचे नगरसेवक नवनाथ अशोक देशमुख यांना बसच्या मागील बाजूचा धक्का लागल्याने ते पडले व जखमी झाले. बस मधील विद्या बाजीराव धनावडे , हिराबाई यशवंत सावंत , कविता विठ्ठल धनावडे , आशा रामचंद्र जवळ हे किरकोळ जखमी झाले . त्यांचेवर शासकीय रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)