बसस्थानकात शुकशुकाट

जिल्हा बंदमुळे एसटीच्या 700 फेऱ्या बंद, लाखोंचे नुकसान

सातारा, दि. 25 (प्रतिनिधी) – मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी जिल्हा बंदची हाक दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर सातारा आगाराच्या 700 एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्या. बसस्थानकात दिवसभर शुकशुकाट होता. प्रवाशांना बसस्थानकातून माघारी जावे लागले तर परगावाहून आलेले प्रवासी बसस्थानकातच अडकून पडले. चाकरमान्यांनाही आज बंदमुळे घरीच बसावे लागले.
औरंगाबाद जिल्ह्यात काकासाहेब शिंदे या मराठा आंदोलकाने जलसमाधानी घेतल्यानंतर मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यानुसार बुधवारी सातारा बंद पुकारण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून एसटी प्रशासनाने सर्व एसटी फेऱ्या दिवसभर बंद ठेवल्या होत्या. दिवसभरात 700 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. एसटी बंद राहिल्यामुळे दिवसभर बसस्थानकात शुकशुकाट होता. सर्व एसटी गाड्या बसस्थानकात उभ्या राहिल्यामुळे एसटी महामंडळाचे दुपारपयर्पंत 11 लाख रुपयांचे नुकसान झाले. सातारा आगाराबरोबरच जिल्ह्यातील सर्वच प्रमुख आगारांमध्ये दिवसभर एसटी गाड्या उभ्या होत्या.
एसटी प्रशासनाने सर्व एसटी फेऱ्या रद्द केल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. बाहेरगावी जाणाऱ्या अनेक प्रवाशांनी तिकिटे आरक्षीत केली होती. त्यांनाही तिकिटे रद्द करावी लागली. सातारा परिसरातील अनेकजणांना खासगी गाड्यांचा आसरा घ्यावा लागला. परंतु, बहुतांशी वडापही बंद असल्याने प्रवाशांची गोची झाली. नियमीत एसटीने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचाही यामुळे खोळंबा झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रिक्षा बंदमुळे प्रवाशांचे हाल
एसटी बंद असल्या तरी रिक्षाचा आधार प्रवाशी घेत असतात. तथापि, रिक्षाही बंद असल्यामुळे नागरिकांचे विशेषत: वृद्ध व महिला प्रवाशांचे हाल झाले. रिक्षांसह वडाप वाहतूकही बंद होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)