बलुचिस्तानमधील महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा संयुक्‍त राष्ट्रामध्ये

बलुच कार्यकर्त्या महिलेने मांडली व्यथा

जिनिव्हा – बलुचिस्तानमधील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार समितीत बलुचिस्तानमधील मानवाधिकार कार्यकर्त्या करिमा बलोच यांनी आवाज उठवला. पाकिस्तान सरकार देशातील स्त्रियांवर अन्यायकारक ठरणाऱ्या धर्मांध शक्तींना पाठिंबा देत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बलोच विद्यार्थी संघटना ‘आझाद’च्या माजी प्रमुख असलेल्या करिमा बलोच यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार समितीच्या 39 व्या बैठकीत पाकिस्तानवर निशाणा साधला. मागील दोन वर्षांपासून पाकिस्तान लैंगिक विषमतेच्या यादीत सर्वात मागे असल्याचा दाखला त्यांनी यावेळी दिला. जागतिक लैंगिक असमानता अहवालानुसार 157 देशांच्या यादीत पाकिस्तान 121 व्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने वारंवार आवाहन करुनसुद्धा देशात अजूनही महिलांवर अन्यायकारक ठरणाऱया इस्लामिक कायद्याचाच प्रभाव असल्याचेही त्या म्हणाल्या.

देशातील मध्ययुगीन मूलतत्ववादी इस्लामिक कायद्यांमुळे स्त्रियांवर अन्याय करणाऱयांच्या हाती आयतेच कोलीत मिळाल्याचे त्या म्हणाल्या. कुंटुंबाच्या सन्मानाच्या नावाने आपल्या बहिणीचीच निघृण हत्या करणाऱ्या भावाची अशा कायद्यामुळे निर्दोष सुटका होते. बलात्कार करणारे आरोपी अशा पुरुषसत्ताक कायद्यांमुळे मोकाट फिरत असल्याचे त्या म्हणाल्या. या अशा महिलांविरोधी कायद्यांच्या जोरावर धार्मिक मूलतत्ववाद्यांनी महिला स्वातंत्र्याविरुद्ध आघाडीच उघडली असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांची अवस्था अतिशय केविलवाणी
शाळेत जाणाऱ्या मुलींना धमकी व त्यांच्यावरील हल्ले ही नेहमीची बाब झाली आहे. त्यांमुळे अर्ध्यावर शाळा सोडणाऱ्या मुलींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बलुचिस्तानमध्ये स्त्री साक्षरता दर नीचांकी पातळीवर आहे. बलुचिस्तानमधील मानवाधिकारांची पायमल्ली ही चिंतेची बाब असून विशेषत: तेथील महिलांची अवस्था केविलवाणी असल्याचे त्या म्हणाल्या.

एखाद्या महिलेवर बलात्कार अथवा तिचा खून झाला असल्यास त्यात त्या महिलेचाच काहीतरी दोष असेल असा निष्कर्ष काढण्यात येतो म्हणत त्यांनी बलुचिस्तानमधील अराजकतेबाबत भाष्य केले. आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानमधील महिलांवरील अत्याचारांना वाचा फोडल्याने देशविघातक कृती ठरवून आपल्याला बदनाम करण्यात येईल. असेही त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)