बलात्कार प्रकरणात एकाला दहा वर्षे सक्तमजुरी : त्याला ऍट्रॉसिटीनुसारही सुनावण्यात आली आहे शिक्षा

तर दुसऱ्याला धमकाविल्याप्रकरणात दोन वर्षे सक्तमजुरी
पुणे- चुलत्यासोबत घरी चाललेल्या तरूणीला रस्त्यावरून बाजूला ओढत नेत बलात्कार करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 16 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश एम.एम.देशपांडे यांनी हा आदेश दिला आहे. पीडित मुलगी अनुसुचित जातीची असल्याचे माहित असताना अत्याचार केल्यामुळे त्याला ऍट्रॉसिटीच्या विविध कलमान्वये शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात ऍट्रॉसिटीनुसार सुनावण्यात आलेली ही पहिलीच शिक्षा आहे. तर दुसऱ्या आरोपीला धमकाविल्याप्रकरणात 2 वर्षे सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
आणि 16 हजार रूपये दंड सुनावला आहे.
दौलत उर्फ रवींद्र भिमाजी कोतवाल (वय 25) याला ऍट्रॉसिटीनुसार, तर आणि गणेश सुरेश कोतवाल (वय 25, दोघेही रा. अष्टापूर, ता. हवेली जि. पुणे) याला धमकाविल्याप्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे.
याबाबत पीडित मुलीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खटल्यात सरकारी पक्षातर्फे ऍट्रॉसिटीच्या विशेष सरकारी वकील भारती कदम यांनी 9 साक्षीदार तपासले. त्यांना तपास कामी पोलीस नाईक संजय जाधव आणि पोलीस हवालदार सुनील मोरे यांनी मदत केली.
पीडित मुलगी ही चुलत चुलत्यांबरोबर 8 जुलै 2009 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कामावरून घरी जात होती. वाडेबोल्हाई ते राहू रस्त्यावरून निघाले होते. ते वाडेबोल्हाई गावच्या हद्दीत थांबले. त्यावेळी आरोपींनी पीडित मुलीच्या चुलत्यांना मारहाण करून दौलतने तरूणीला गायरानात ओढत नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिच्या जवळील 1 तोळ्याची सोन्याची साखळी आणि 700 रूपये जबरदस्तीने काढून घेतले. याबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची आणि घर जाळून टाकण्याची धमकी दिली. तिच्यावर झालेल्या अत्याचारनंतरही तीने आणि तिच्या घरच्यांनी तब्बल 1 महिना 8 दिवस फिर्याद दिली नाही. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर उपवीभागीय अधिकारी रवींद्र परदेशी यांनी गुन्ह्याचा तपास केला. आरोपींनी सोन्याची चेन ज्या सोनाराला विकली होती. त्या सोनाराची साक्ष, पीडित मुलगी, प्रत्यक्षदर्शी चुलत्याची साक्ष, वैद्यकीय अहवाल या प्रकरणात महत्वाचा ठरला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)