बलाढ्य भारताला अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले

दुबई  – शेवटच्या षटकापर्यंत उत्कंठावर्धक झालेल्या लढतीत बलाढ्य भारतीय संघाला अफगाणिस्तानच्या संघाने बरोबरीत रोखला. यावेळी अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 252 धावा करुन भारतासमोर 253 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना भारताला 49.5 षटकांत सर्वबाद 252 धावा करता आल्याने सामना अनिर्णीत राहिला.

253 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय सलामीवीरांनी सावध सुरुवात करताना 9व्या षटकांत संघाचे अर्धशतक फलकावर लावले तर 15 व्या षटकांत संघाला शंभरी पार करुन दिली. मालिकेत लागोपाठ दुसऱ्यांदा भारतीय संघाने शतकी सलामी दिली. मात्र, लागलीच आपले आठवे अर्धशतक झळकावणारा अंबाती रायुडू 4 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने 49 चेंडूत 57 धावा करुन परतला. त्याने राहुलच्या साथीत 17.1 षटकांत 110 धावांची सलामी दिली. तर, आपले दुसरे अर्धशतक झळकावणारा लोकेश राहुलही 66 चेंडूत 60 धावा करून परतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यामुळे बिनबाद 110 वरुन भारताची 2 बाद 127 अशी छोटीशी घसरगुंडी उडाली. तर बचावात्मक खेळ करणारा भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा बळी ठरला. यावेळी भारताची 3 बाद 142 अशी अवस्था झाली. तर मनिष पांडे केवळ आठ धावा करून परतला. यानंतर दिनेश कार्तिक आणि केदार जाधव यांनी डाव सावरताना भारताला द्विशतकाचा टप्पा गाठून दिला. मात्र, लागलीच केदार जाधव धावबाद झाला. तर, दिनेश कार्तिकही 44 धावांवर बाद झाल्याने भारताची 5 बाद 206 अशी घसरगुंडी उडाली. यानंतर दिपक चहारही लवकर परतला. यानंतर, रविंद्र जडेजाने एक बाजु लाऊन धरत भारताला विजयाच्या समीप आणले मात्र, संघाच्या विजयाला एक धाव बाकी असताना तो बाद झाल्याने. सामना बरोबरीत सुटला. सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीचे प्रदर्शन करत बलाढ्य भारतीय संघावर दबाव आणत सामन्यावर नियंत्रण राखले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहझादने जावेद अहमदीच्या साथीत तुफानी फटकेबाजी करताना 12.4 षटकांत 65 धावांची सलामी दिली. ज्यात जावेदच्या केवळ 5 धावा होत्या. जावेद बाद झाल्यानंतर अफगाणिस्तानची बिनबाद 65 वरून 4 बाद 82 अशी अवस्था झाली होती. यानंतर गुलबदिन नायबला हाताशी घेत शहझादने अफगाणिस्तानचा डाव सावरताना संघाला शंभरी पार करुन देत आपले शतक फलकावर लगावले. शहझादने 88 चेंडूत 10 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने आपले पाचवे शतक झळकावले.

मात्र, संघाच्या 180 धावा झाल्या असताना शहझादला बाद करत केदार जाधवने भारताला महत्त्वपूर्ण बळी मिळवून दिला. शहझादने 116 चेंडूत 11 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 124 धावांची धडाकेबाज खेळी केली. यानंतर मोहम्मद नबीने आपली फटकेबाजी चालू ठेवत संघाला द्विशतकी टप्पा गाठून देत आपल्या कारकिर्दीतील 12 वे अर्धशतक झळकावले. खलिल अहमदने नबीला बाद करत भारताला आठवा बळी मिळवून दिला. नबीने 56 चेंडूत तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 64 धावा केल्या.

त्यापूर्वी, भारताने कर्णधार रोहित शर्मासोबत शिखर धवनलाही आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी लोकेश राहुल आणि अंबाती रायुडू भारतीय डावात सलामीची जबाबदारी सांभाळतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)