बफे यांची पेटीएममध्ये गुंतवणूक 

बर्कशायर हॅथवेचा प्रतिनिधी पेटीएमच्या संचालक मंडळावर 
नवी दिल्ली: पेटीएम या डिजीटल सेवा देणाऱ्या भारतातील कंपनीत बर्कशायर हॅथवे कंपनीने गुंतवणूक करणार असल्यीा घोषणा केली आहे. पेटीएमच्या संचालक मंडळावर हॅथवेचा प्रतिनिधी असणार आहे. पेटीएम कंपनीला वन 97 ही कंपनी चालविते. या कंपनीचे 3 ते 4 टक्‍के इतके भागभांडवल वॅरेन बफेट संचलीत बर्कशायर हॅथवे कंपनीने विकत घेण्याचे ठरविले आहे.
यामुळे भारतील डिजीटल पेमेंट मोहिमेला मोठी चालणा मिळणार असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. पेटीएमबाबत जागतिक पातळीवरील गुंतवणूकदार कमालीचे आशावादी आहेत. भारतातील बदलणारी व्यवहार व्यवस्था पाहून विजय शंकर शर्मा यानी ही कंपनी चालू केली आहे. तीला सुरुवातीपासून भांडवलाची वाणवा जाणवली नाही. या कंपनीत स्वॉफ्टबॅंक, अलीबाबा समूह आणि ऍण्ट फायनान्सीयलची गुंतवणूक आहे.
वॅरेन बफे या अगोदर तंत्रज्ञान कंपन्यात गुंतवणूक करीत नसत. त्यांच्यातील गुंतागुंत मला समजत नाही. आणि जी बाब आपल्याला समजत नाही तीच्यात गुंतवणूक करणे बरोबर नसल्याचे त्यांचे मत होते. मात्र 88 वर्षीय बफे यांचे मत आता बदलू लागले आहे. त्यानी या अगोदर ऍपल आणि उबेर कंपन्यात चांगलीच गुंतवणूक केली असून आता भारतातील इतर तंत्रज्ञान कंपन्यातही ते गुंतवणूक करण्याची शक्‍यता असल्यो बोलले जाऊ लागले आहे.
यामुळे बफेट यांच्या बर्थशायर हॅथवे या कंपनीची गुंतवणूक असलेली पेटीएम ही भारतातील पहिली कंपनी ठरणार आहे. दोन ते अडीच हजार कोटी रुपयांची ते गुंतवणूक करणार आहेत. या गुंतवणुकीमुळे पेटीएमला चांगलाच फायदा होण्याची शक्‍यता असून ई-मार्केटमध्ये आणि इतर डिजिटल वॉलेट कंपन्यांना टक्‍कर देण्यास त्यांना अधिक बळ मिळेल असं म्हटले जात आहे.
सध्या पेटीएमला फ्लिपकार्टचा फोनपे, गुगलचा तेज, व्हॉट्‌सऍप आणि रिलायन्स जिओकडून स्पर्धा होत आहे. मात्र या गुंतवणुकीने बाजारातील नेतृत्व कायम टिकवण्यास यश येईल. बफे यांनी 2011 मध्ये बर्कशायर इंडियाची स्थापना केली होती. विमा क्षेत्रातील बजाज अलायन्सबरोबर भागीदारी केली होती, मात्र दोन वर्षातच ही कंपनी बाहेर पडली. यावेळी भारतातील लालफितीच्या कारभारामुळे बाहेर पडल्याचे सांगितले होते.
याबाबत बोलताना बर्कशायर हॅथवे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतात डिजीटल क्षेत्रातच नाही तर इर क्षेत्रातही वेगाने प्रगती होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कंपनी आगामी काळात भारतातील इतर क्षेत्रातील घडामोडीकडेही लक्ष देणार आहे. कारण इतरांच्या तुलनेत भारताचा विकास दर लक्षणिय आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)