बनावट एटीएम कार्डद्वारे फसवणूक

पिंपरी – बनावट एटीएम कार्ड तयार करून तरुणाची 80 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना वाकड येथे घडली.हर्षित रामकुमार अग्रवाल (वय 23, रा. वाकड सेंटर, भूमकर चौक, वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास कोणीतरी हर्षित यांचे बॅंक खाते, एटीएम कार्ड आणि पासवर्डबाबत माहिती घेऊन बनावट एटीएम कार्ड तयार केले. त्याद्वारे बॅक खात्यातील 80 हजारांची रोकड परस्पर काढून फसवणूक केली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण याबाबत अधिक तपास करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)