बनावट अधिवास प्रमाणपत्र तयार करणारा जेरबंद

न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी


आणखी एकावर गुन्हा दाखल

पुणे- तहसिलदाराचा खोटा शिक्का तयार करून, त्याद्वारे बनावट अधिवास प्रमाणपत्र बनवून राज्य सरकारची फसवणूक केल्याप्रकरणात एकाला खडक पोलिसांनी अटक केली. त्याला 29 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
इरफान अब्दुलभाई शेख (वय 27, रा. कोंढवा खुर्द) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत निवासी नायब तहसिलदार डॉ. सुनील दादाभाऊ शेळके (वय 39, रा. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणात निखिल रत्नाकर दिवसे (घोरपडे पेठ) याच्यावर गुन्हा दाखल आहे. ही घटना जून ते आतापर्यंतच्या कालावधीत घडली. शेख याने राजे जॉन नामक व्यक्तीकडून अधिवास प्रमाणपत्र काढणेकामी कागदपत्रे घेतली. त्याद्वारे जॉन आणि त्याच्या पत्नीचे बनावट अधिवास प्रमाणपत्र तयार केले. त्यावर तहसिलदाराचा खोटा शिक्का तयार करून मारला. त्या बदल्यात जॉनकडून 16 हजार रुपये घेतल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी शेख याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी
गुन्ह्यात वापरलेला खोटा शिक्का जप्त करण्यासाठी, त्याच्याकडे आणखी अधिवास प्रमाणपत्रे मिळून आली आहेत, ती खरी आहेत की खोटी, याचा तपास करण्यासाठी आणि फरार साथीदाराच्या शोधासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)