बदलत्या वातावरणामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ

पिंपरी – शहरात सकाळी थंडी, दुपारी कडक उष्णता व रात्री पुन्हा थंडी असे संनिश्र वातावरण तयार झाले आहे. या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याने शहरातील नागरिक विविध सर्दी, खोकला, घसा दुखी आदी आजारांनी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे, शहरात विविध आजारांनी ग्रस्त असलेल्यांची संख्या वाढली आहे.
नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात कडाक्‍याची थंडी पडलेली होती. त्यानंतर, जानेवारी महिन्यामध्ये थंडी कमी झालेली होती. परंतु, गेल्या आठवडाभरापासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. सतत बदलत्या वातावरणात चढ-उतार जाणवत आहे. थंडी हा ऋतू आरोग्याच्या दृष्टीने सर्वात उत्तम आहे. मात्र, अचानक झालेल्या हवामान बदलामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे.

थंडीच्या दिवसात आहारात समाविष्ट पदार्थ
थंडीच्या दिवसात बाजरी, ज्वारी, मका, जवळी, रागी (फिंगर मिलेट) ही काही सामान्य प्रकारचे अन्नधान्ये आहेत जी आपल्या आहारामध्ये समाविष्ट करावीत. तसेच, गाजर, कांदे, पालक, हिरव्या बीन्स व बीटा-कॅरोटीन आणि “व्हिटॅमिन सी’ सारख्या पौष्टिक स्रोतांचा समावेश आहे.

थंडी सतत कमी-जास्त होत असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. या दिवसात सर्दी, खोकला, घसा दुखणे आदी तक्रारी वाढल्या आहेत. दमा असणाऱ्या रुग्णांचा त्रास वाढला आहे. थंडीमधील अतिसार, श्‍वसनविकार, थंडीताप, विषाणूजन्य ताप, दमा, कोरडा खोकला येणे अशा प्रकारचे रुग्ण आढळतात. विषाणूजन्य आजार पसरण्याची शक्‍यता जास्त असल्याने रुग्णांनी गर्दीत जाणे टाळावे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी जाणे आवश्‍यक असेल तर रुग्णांनी तोंडाला रुमाल बांधावा. थंडीच्या काळात हळद-दूध, कॉफी, तुळशीचा चहा यांचे सेवन करावे. शिळे अन्नपदार्थ, उघड्यावरील पदार्थ, दही, लस्सी, थंडपेय टाळावेत.
– डॉ. शंकर जाधव, वैद्यकिय उपअधीक्षक , वायसीएमएच.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)