बदलती जीवनशैली, बदलता विमा (भाग-२)

बदलती जीवनशैली, बदलता विमा (भाग-१)

इर्डाच्या नव्या दिशानिर्देशांनुसार विमा कंपन्यांना आता पर्यायी विकारांची यादी लहान करावी लागणार आहे. जास्तीत जास्त आजार हे विमा संरक्षणाच्या परिघात आणावे लागणार आहेत. जेणेकरून विमा धारकांना वेगळा रायडर घ्यायची गरज लागणार नाही. येत्या काही काळात आरोग्य विमा पॉलिसीमध्ये दातांचे आरोग्य, वंधत्व, हार्मोन्स रिप्लेसमेंट, मानसिक रोग, गुप्त रोग, स्थूलतेशी निगडीत आजार, अनुवंशिक आजार आणि एडस सारखे आजार सामील केले जाणार आहेत. या आजारांसाठी वेगळे विमा संरक्षण घेण्याची गरज लागणार नाही. इर्डाने महागडे उपचार असणाऱ्या एकूण दहा आजारांना पर्यायी यादीतून काढून टाकून मूळ विमा योजनेत सामील करण्याचे निर्देश दिले आहेत. दंतोपचार खूप महाग असतात आणि एक दात काढून त्या जागी दुसरा दात लावणे यासाठी खूप अधिक खर्च येतो. इर्डाने दंतरोगाला पर्यायी यादीतून काढून टाकत मुख्य विमा संरक्षण मध्ये सामील केल्याने दंतरोगाच्या उपचारांच्या खर्चाची भरपाई विमा कंपन्यांकडून केली जाईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जीवनशैलीतील बदलाचा परिणाम मनुष्याचा मानसिक आरोग्यावरही होत आहे. त्यामुळे मानसिक आजाराच्या रुग्णांची संख्याही वाढते आहे. तणाव आणि नैराश्‍य सारख्या आजारांवरील उपचारही महागले आहेत. त्याची औषधे महागडी असतात. त्यामुळे ती सामान्य लोकांना खरेदी करणेही अवघड असते. मानसिक आजारांसाठी विम्याचे संरक्षण मिळण्याचे निर्देश दिल्याने या आजाराच्या उपचाराचा खर्च विमा कंपन्यांकडून केला जाईल. त्यामुळे मानसिक आजाराने ग्रस्त असलेले जास्तीत जास्त लोक आपले उपचार सहजपणे करू शकतील. फास्ट फूड आणि बदलत्या आहाराच्या सवयी यामुळे जडणारा स्थूलपणा ही आणखी एक मोठी समस्या आहे. अगदी लहान 10 वर्षाची मुले देखील या आजाराने ग्रस्त होतात. स्थूलपणा कमी करण्यासाठी लोक हजारो रुपये औषधे, पथ्यपाणी यावर खर्च करतात. विमा संरक्षण दिल्याने या आजाराचा खर्च विमा कंपन्या करु शकतील. त्याशिवाय लैंगिक आजाराच्या उपायांवरही लोक खूप खर्च करतात. विविध प्रकारच्या हार्मोन्सच्या कमतरतेमुळेही व्यक्‍तीला लैगिंक आजार होतात. यावरचा इलाजही महागडा आहे. विमा कंपन्या याच्याशी निगडीत काही बदल योजनांमध्ये करतील तर लोकासाठी ते सोयीचे होईल.

– राकेश माने 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)