बदगी घाटात दुचाकी घसरून दुचाकीस्वार ठार

ओतूर- जुन्नर तालुक्‍यातील खामुंडीजवळील बदगी घाटात दुचाकी घसरून अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी (दि. 27) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या अपघातात बबन दशरथ शिंगोटे (वय 51, रा. बदगी, ता. अकोले, जि. अहमदनगर) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या अपघाताबाबत ओतूर पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार के. एच. साबळे यांनी सांगितले की, खामुडीजवळील बदगी घाटात बुधवारी सायंकाळी सातच्या दरम्यान बबन शिंगोटे बदगीवरून ओतूरकडे येत असताना खामुंडी गावच्या हद्दीत दुचाकी (क्र. एमएच 17 बीटी 1790) वरून येत असताना दुचाकी घाटातीत चारीत घसरून अपघात झाला. यावेळी त्यांना मार लागून ते जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती संपत महादू औटी (रा. बदगी, ता. अकोले) यांनी ओतूर पोलीस ठाण्यात दिली आहे. या अपघाताचा पुढील तपास ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पी. डी. मोहरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.