‘बत्ती गुल’ने बोपखेल हैराण

दिघी – गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे बोपखेलचे नागरीक हैराण झाले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना आपण नक्‍की शहरातच राहत आहोत की काय? असा प्रश्‍न पडला आहे. गेल्याच वर्षी दिघी-बोपखेल भागासाठी स्वतंत्र वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र वाहिनी घेतली असताना देखील उजेड-अंधाराचा खेळ या परिसरातील नागरिकांचा पिच्छा सोडण्यास तयार नाही. सर्वांत आश्‍चर्याची बाब म्हणजे एवढा त्रास होत असताना देखील महावितरणचे अधिकारी मात्र कोणतीही समस्या नसल्याचे सांगत आहेत.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने भरमसाठ वीज बिल भरुनही कधीही वीज पुरवठा खंडित होईल अशी नागरिकांच्या मनात कायम भीती असते. लोकसंख्या वाढीमुळे मागणी आणि या वाहिनीवरील लोड वाढला असल्याचे काही स्थानिक नागरीक सांगतात, परंतु स्वतंत्र वाहिनी दिली असताना देखील अशी समस्या कशी उद्‌भवू शकते, असा प्रश्‍न देखील उपस्थित केला जात आहे.

गृहिणींना त्रास
सतत वीज-पुरवठा खंडित होत असल्याने दूध-भाजी व अन्य स्वयंपाक खराब होत आहे. अचानक वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे मिक्‍सर व किचनमधील इतर उपकरणे बंद पडतात आणि गृहिणींचा त्रास वाढतो. गेल्या आठवड्यात एकदा सकाळी अकरा वाजता खंडित झालेला वीजपुरवठा सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत सुरळीत झाला नव्हता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विद्यार्थ्यांनाही अडचण
वारं-वार वीजपुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांना देखील अभ्यास करण्यात अडचणीत येत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. शैक्षणिक सत्र सुरू होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. लवकरच प्रथम सत्राच्या परीक्षा होणार असून, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला वेग आला आहे. वीज पुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये व्यत्यय येत आहे.

व्यापारीवर्गास फटका
वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने आणि कित्येकदा बराच वेळ वीज नसल्याचा फटका नागरिकांसोबत व्यावसायिकांनाही बसत आहे. किंबहुना व्यावसायिकांचे अधिक नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. वीज पुरवठा बंद झाल्यास दूध डेअरी, स्वीट मार्ट, इलेक्‍ट्रिक्‍स आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स शॉप्स, तसेच वीज उपकरणांचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांना या लपंडावाचा फटका बसत आहे.

बिघडते दिवसाची सुरुवात
सकाळच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यास नागरिकांची दिनचर्या विस्कळीत होते. या परिसरात मोठ्या संख्येने कामगारवर्ग राहतात. सकाळच्या वेळी वीज गेल्यास उंच इमारतींच्या वरच्या मजल्यापर्यंत पाणी जात नाही. आंघोळीपासून पिण्याच्या पाण्यापर्यंतची टंचाई सहन करावी लागते. सकाळी कामाला जाण्यापूर्वी कपडे इस्त्री, स्वयंपाक अशी कित्येक आवश्‍यक कामे बाधित होतात. लवकरात लवकर ही समस्या सोडवण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दिघी-बोपखेल परिसरात स्वतंत्र लाईन घेतल्यामुळे, या भागातील वीज पुरवठा सुरळीत आहे. 24 ऑगस्ट रोजी बोपखेल परिसरात दिवसभर वीज पुरवठा बंद होता. रामनगर येथे झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा बंद होता. सध्या कोणतीही अडचण नाही.
-मंगेश सोनवणे, सहाय्यक अभियंता, महावितरण
मागील वर्षी दिघी-बोपखेल भागातील लोकांना विजेबाबत तक्रारी होत्या. आता स्वतंत्र लाईन टाकण्यात आली आहे. यामुळे कायमस्वरुपी अडचणी सुटल्या आहेत. लहान-लहान तांत्रिक समस्यांमुळे वीज पुरवठा बंद होत असेल. रामनगरमध्ये तांत्रिक अडचण आल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता.
-विकास डोळस, नगरसेवक, दिघी-बोपखेल, प्रभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)