बड्या व्यावसायिकांच्या अतिक्रमणांना अभय!

राजगुरूनगर- राजगुरुनगर परिषदेच्या हद्दीत असलेल्या शिरूर-राजगुरुनगर भीमाशंकर रस्त्यावरील व पाबळकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे आज (मंगळवारी) काढण्यात आली. मात्र, यावेळीह मोठ्या व्यावसायिकांची अतिक्रमणे काढण्यात आली नसून पथारीधारकांना लक्ष केल्याने प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्‍त करण्यात आली.
पुणे-नाशिक महामार्गावर दररोज मोठी वाहतूककोंडी होत असते. त्यावर प्रशासन कोणतीचे भूमिका घेत नव्हते, दररोज लाखो वाहने पुणे-नाशिक महामार्गारून जा-ये करीत असतात. महामार्गावर जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने वाहनचालक पर्यायी मार्गाचा वापर करीत असल्याने अनेक वाहने राजगुरुनगर शहरातून येतात. त्यामुळे शहरातील वाहतूककोंडी होते. त्यातच अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमणे करून स्टॉल उभे केले होते, यामुळे शहरातील गर्दी वाढली. शहरात विद्यार्थी व पादचाऱ्यांना जाण्यासाठी मोठी अडचण होत होती. तर वाडा रस्त्यावर पथारी व स्टॉधारकांची गर्दी झाल्याने रस्त्यावरून जाणे जिकीरीचे झाले होते. याबाबत अनेक नागरिकांनी अधिकारी आणि सोशल मीडियावर तक्रारी केल्या होत्या. याचीच दखल घेत ही कारवाई करण्यात आली. प्रांताधिकारी यांच्या आदेशाने सार्वजनिक बांधकाम विभाग, राजगुरुनगर पोलीस ठाणे, नगरपरिषद यांच्या संयुक्त माध्यमातून करण्यात आली. या कारवाईत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता भास्कर क्षीरसागर, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप. नायब तहसीलदार राजेंद्र जाधव, मंडल अधिकारी नाना उगले, नगरपरिषदेचे गणेश देव्हरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येळे आदी सहभागी झाले होते.

  • पुनर्वसन करण्यात अपयश
    राजगुरुनगर शहरात दिवसेंदिवस रस्त्याच्या जवळ बेकायदेशीर अतिक्रमणे वाढत असल्याने नगरपरिषद प्रशासनावर ताशेरे ओढले जात होते. सार्वजनिक विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले होते. दरम्यान, आठ महिन्यांपूर्वी शहरातील अतिक्रमणे हटविण्याची धडक कारवाई सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांनी केली होती मात्र, पथारीधारकांचे पुनर्वसन न झाल्याने त्यांनी पुन्हा रस्त्यावर दुकाने थाटली होती त्यामुळे वाडा रस्त्यावर व पाबळकडे जाणाऱ्या रस्त्यार पुन्हा अतिक्रमणे झाली ती हटविण्याची मागणी होती, त्यानुसार आज पुन्हा अतिक्रमणे काढण्यात आली.
  • सरसकट कारवाई करण्यात आली आहे. काही महत्त्वाच्या ठिकाणी सार्वजनिक विभागाने परवानगी दिलेल्या अतिक्रमणे काढली नाहीत. ती काढण्याचा अधिकारी नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाला आहे. कोणाचेही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली आहे. पथारी झोन तयार करण्यासाठी नगर परिषदेला कळविले आहे. यापुढे नागरिकांनी रस्त्यावर अतिक्रमणे करू नयेत.
    – आयुष प्रसाद, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)