बचत, गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापन (भाग-२)

बचत, गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापन (भाग-१)

अगदी उत्तम शेअर्सची निवड जरी जमत नसेल तरी अगदी ढोबळ मानानं सेन्सेक्‍स या निर्देशांकात जरी गुंतवणूक केली असती (इंडेक्‍स फंडद्वारे) तरी त्यात काही पट वाढ झाली असती. (बरोबर दहा वर्षांपूर्वी म्हणजे 2008 मध्ये सेन्सेक्‍स होता 7700 व आज आहे 38250, म्हणजे जवळजवळ 5 पट वाढ).

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसरे एक उदाहरण म्हणजे अनेक लोक स्थावर मालमत्ता म्हणजेच खरी संपत्ती असं समीकरण जुळवतात. परंतु मागील 10 वर्षांत त्यातील गुंतवणूकदारांचं काय झालंय यावर न बोललेलंच बरं.

असो, गुंतवणुकीतून संपत्ती करताना दुसरी महत्त्वाची गोष्ट हवी, ती म्हणजे संयम. साधा दाखला द्यायचा तर नुकत्याच लावलेल्या झाडापासून लगोलग फळांची अपेक्षा ठेवणं मूर्खपणाचं आहे, तरी दुसरीकडं त्याची योग्यप्रकारे निगा राखणं हे देखील गरजेचं आहे.

आता वेल्थ क्रिएशनसाठी काही मुद्दे लक्षात घेऊ,

1. आपल्या जबाबदाऱ्या ओळखणं – म्हणजेच आत्ताची आपली आर्थिक परिस्थिती व ऋण यांचा मेळ घालणं.

2. शिस्त – आपलं प्रत्यक्षातील निव्वळ उत्पन्न व होणारा खर्च यांची योग्यप्रकारे सांगड घालणं. उत्पन्नाच्या कमीतकमी 20% रक्कम तरी गुंतवणूक म्हणून बाजूला पडायला हवी. महिन्याच्या खर्चात, गुंतवणूकीसाठीची रक्कम व विविध विम्याचे वार्षिक हफ्ते भागिले 12 करून ती रक्कम, खर्च म्हणून गृहीत धरून वेगळी ठेवणं.

3. गुंतवणूक व्यवस्थापन – त्या गुंतवणूकीचं योग्यप्रकारे व्यवस्थापन करणं म्हणजेच त्या गुंतवणुकीचे काही भाग करणं, जसे की अचानक उद्भवणाऱ्या खर्चांसाठी थोडी रक्कम वेगळी ठेवणं जी ताबडतोब उपलब्ध होऊ शकते, काही गुंतवणूक ही जोखीमरहित पर्यायात गुंतवणं ज्यातून काही प्रमाणात नियमित उत्पन्न येईल व काही गुंतवणूक ही त्याची संपत्ती व्हावी यासाठी मोजकी जोखीम घेऊन प्रदीर्घ काळासाठी गुंतवणं ज्याला आपण कदापि हात लावणार नसू.

4. जोखीम साक्षरता – गुंतवणुकीबाबत आपण स्वतः किती जोखीम घेऊ शकतो, (यालाच मी जोखीम साक्षरता असंही म्हणतो) हे प्रामाणिकपणे तपासणं. म्हणजे जोखीम असलेल्या पर्यायात गुंतवणूक केल्यानंतर थोडा तोटा दिसल्यास ती काढून घेणं. याचाच अर्थ जोखीम असलेल्या पर्यायात अशीच गुंतवणूक करावी जी निम्मी झाली तरी त्याचा आपल्या दायित्वावर किंवा रोजच्या जीवनावर परिणाम होणार नाही.

5. एकाच गुंतवणूक पर्यायात तुमची सर्व गुंतवणूक नसावी.

6. विश्वास व संयम – योग्य मार्गदर्शनाद्वारे, योग्य प्रकारे केलेल्या गुंतवणुकीवर विश्वास ठेऊन त्याबाबत संयम बाळगणं.

7. देखरेख – अगदी रोज नाही तरी, साधारणपणे वर्षातून एकदा तरी आपली केलीली गुंतवणूक तपासणे व त्यात गरज वाटल्यास बदल करणं व केलेल्या गुंतवणूकीवर अपेक्षित परतावा मिळाला असल्यास त्यातून काही अंशी तरी बाहेर पडणं.

8. सुरक्षितता – कुटुंबातील कमावत्या प्रमुख व्यक्तीचा त्याच्या वार्षिक उत्पन्नाच्या कमीत कमी 17 पट टर्म इन्शुरन्स काढणं. 17 पट कारण, उदा. कमावत्या व्यक्तीच्या दुःखद निधनानं अचानकपणे घरात येणारं उत्पन्न बंद होतं, त्यावेळीस या प्रकारच्याच विम्याचा योग्य फायदा होतो. (उदा. महिन्याचे निव्वळ उत्पन्न 30 हजार असेल तर वार्षिक उत्पन्न 3.6 लाख रुपये धरून त्याच्या 17 पट म्हणजे साधारणपणे 61 लाख रुपयांचा आयुर्विमा. व हे मिळालेले 61 लाख रुपये जर अगदी 6% जोखीममुक्त पर्यायात गुंतवले तर त्याचं वार्षिक व्याज होतं 3.66 लाख रुपये, भागिले 12 केल्यास त्या कुटुंबास महिना 30 हजार रुपये घरबसल्या मिळू शकतात, जे ती निधन पावलेली व्यक्ती दरमहा घरात आणत असे).

9. विमा व गुंतवणूक यांची गल्लत न करणं – कोणत्याही भूल थापांना बळी न पडता कोणत्याही विम्यातील गुंतवणुकीचा अंतर्गत परताव्याचा दर (खठठ) काय आहे हे जाणून घ्यावा. तो दर व महागाईचा दर सारखाच असेल तर ती गुंतवणूक ही गुंतवणूक ठरू शकत नाही.

10. कर – चांगल्या सीएच्या मार्गदर्शनानं नियमितपणे कर नियोजन करणं गरजेचं आहे. परंतु, त्याच बरोबर फक्त कर वाचवणे हेच उद्दिष्ट ठेऊन माहित नसलेल्या फसव्या अशायोजनांत गुंतवणूक करणं (उदा. युलिप) टाळावं.

11. उद्दिष्टांसाठी योग्य नियोजन – आपल्या वयोमानानुसार, आयुष्यातील प्रमुख टप्प्यांसाठी उदा. स्वतःचं घर, गाडी, स्वत:चलग्न, विदेश प्रवास, मुलांचं संगोपन, शिक्षण, उच्च शिक्षण, त्यांचं लग्न व आपली निवृत्ती यांसाठी योग्यप्रकारे योग्य पर्यायात केलेली गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. म्हणून Invest early and Invest regularly.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)