बगदादी मेला! आमच्यावर झालेल्या बलात्काराचे काय? नोबेल विजेत्या लेखिककेचा सवाल

मोसुल : बगदादी तर मेला पण आमच्यावर झालेल्या बलात्काराचे काय? असा सवाल याझिदी नोबेल पुरस्कार विजेत्या नादीया मुराड यांनी केला आहे.

अमेरिकेने राबवलेल्या शोध मोहीमेनंतर इसिसचा म्होरक्‍या बक्र अल- बगदादी याने आत्मघाती स्फोट घडवून स्वत:चे जीवन संपवले. इस्लमिक स्टेट अतिरेक्‍यांनी त्यानंतर गुन्हेगारी कृत्ये सुरूच ठेवली आहेत. या बंडखोरांच्या तावडीत सापडलेल्या आणि त्यांच्यावर बंडखोरांनी वारंवार बलाऱ्कार केलेल्या मुराड या याझदी नोबेल विजेतीचा समावेश होता. युध्दात लैंगिक गुन्हे घडू नये, म्हणून केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले.

युध्दाती; लैंगिक गुन्ह्यावर प्रकाशझोत टाकण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या विशेष नमंत्रितांच्या अधिवेशनात त्या बोलत होत्या. त्य म्हणाल्या, बगददादीच्या मृत्यनंतर त्यांच्या ताब्यता असणाऱ्या माझ्या सहा नणंदेंशी अीाण कुटुंबियांशी मी बोलले. ते सर्व जण म्हणाले, ठीक झाले. पण, हा फक्त बगदादी मेला. बाकी इसिसचं काय? आमच्यावर बलात्कार करणाऱ्यांचं काय? त्यांनी आम्हाला विकलं, त्याच्या ताब्यात अजून मुली आहेत. त्यांच्या ताब्यात आमची मुले आहेत. सुमारे तीन लाख याझिदी बेपत्ता आहेत. त्यांची काहीच माहिती मिळत नाही.

इराकच्या उत्तरेकडे अल्पसंख्यांक असणाऱ्या याझिदी समजातील पाच हजार हजार जणांचे 2014मध्ये सामुहिक हत्याकांड करण्यात आले, संयुक्त राष्ट्रेचा अहवाल सांगतो. शिमजर अत्याचर नावाने प्रसिध्द पावलेल्या घडनेत 10 हजार महिला आणि मुलांचे अपहरण करून त्यांना शरीरविक्रयाची गुलामगिरी करायला लावली. मराड यांच्या अनेक बांधवांची सामुहिक हत्याकांडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सिरीया आणि इराकमधये याझिदींच्या झालेल्या सामुहिक हत्याकांडाला संयुक्त राष्ट्र संघाने 2016 मध्ये नरसंहार म्हणून संबोधले. या समाजाकडून दैत्याची भक्ती करण्यात येते या समजूतीतून त्यांना नामशेष करण्याचा प्रयत्न झाला. प्रत्यक्षात मात्र ते ख्रिस्ती, झॅरोस्ट्रीयन आणि मुस्लीम तत्वज्ञानाचा स्वीकार करतात. अमेरिकी सैन्याने छपा टाकलेला ऑपरेशन कल्ल्या मुल्लेर येथे इसिसच्या बंडखोरांनी अनंत अत्याचार केले. मानवता वादी कार्यकर्ती ऍरीझॅनाला तेथे ताब्यात ठेवले. तेथे तिचा लैंगिक गुलाम म्हणून वापर करण्यात आला. त्यामुळे बगदादीच नव्हेत तर साऱ्या इसिसचाच नायनाट करायला हवा,अशी भूमिका मारूड यांनी मांडली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.