बंदी असतानाही मांगूर माशाचे उत्पादन सुरूच

उजनी काठावरील गावांत अवैधरित्या तळी खोदून धंदा; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

पळसदेव- केंद्र शासनाने बंदी घातलेल्या व आरोग्यास अपायकारक असलेल्या मांगूर माशांची पैदास पळसदेव, भावडी, चांडगाव, गंगावळन, माळेवाडी, काळेवाडी, डाळज यासह उजनी काठावर मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

उजनी धरण संपादित गावात मोठ-मोठी तळी तयार करून त्यामध्ये मांगूर माशांची पैदास केली जात आहे. या भागातील काही गावगुंडांनी शेतकऱ्यांना वर्षाला 60 ते 70 हजार रुपये देण्याचे आमिष दाखून जमिनी भाड्याने घेतल्या आहेत. या जमिनीत विनापरवाना तळी काढून मांगूर माशाचे संगोपन केले जात आहे.

या माशाच्या संगोपनासाठी परराज्यातील नागरिकांना या ठिकाणी आणून त्यांच्याकडून हा व्यवसाय करून घेतला जात आहे. या माशांना खाण्याकरिता मांस लागते. याकरिता कोंबड्या, कुत्री तसेच मोठ्या जनावरांचे मांस मशीनवर बारीक करून ते शिजून अशा मांगूर माशांना खायला दिले जाते. त्यामुळे नदीकाठी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटते आहे. मांशा लागणारे खाद्य ज्या इंजिनच्या साह्याने बारीक केले जाते, अशा इंजिनांचे ऑईलही पाण्यात मिसळत आहे. शिवाय या माशांची पहिली खेप काढली की ते पाणी नदी पात्रात सोडून दिले जात असल्याने नदीचे पाणीही दूषित होत आहे.

मांगूर माशांची पैदास करण्यासाठी परराज्यातून कामगार बोलावले जातात. त्यांच्याकरिता पत्र्याची घरं उभारून वीज जोडसह टीव्ही, फ्रिज, हिटर, गॅसशेगडी अशा सुविधा पुरविज्या जात असल्याने हे परप्रांतीयही असे बेकायदा काम करण्यास तयार होत आहेत. या शिवाय उजनीलगतच्या गाव परिसरात अशा पद्धतीने वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीयांची कोणतीही माहिती संबंधीत ठेकेदारांकडून
पोलीस पाटील अथवा स्थानिक पोलीस स्टेशनला कळविली जात नसल्याने भविष्य काळात काही छोट्या मोठ्या गुन्ह्यांसह कोणताही अनुचित प्रकार घडल्यास याला होण जबाबदार? असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.

  • उजनी धरणासाठी संपादित जमिनीत अशा प्रकारे खोदकाम करण्याची परवानगी नाही. ज्या नागरिकांनी आशा प्रकारे मांगूर मशाची तळी केली आहेत, त्यांना नोटीस दिल्या आहेत आणि लवकरच त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात येणार आहे.
    – सचिन मेटे, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग, पळसदेव
  • मांगूर माशाची पैदास करण्यासाठी परवानगी मिळावी याकरिता न्यायालयीन लढाई चालू आहे. मांगूर माशाच्या अनेक जाती आहेत, त्यातील कॅलरींन गॅरीफीन या माशावर बंदी आहे. बंदी असलेल्या मांगूर माशाचे उत्पादन आम्ही घेत नाही. सध्या, दुष्काळ आहे. शेतीचे शाश्वत उत्पन्न नाही याकरिता जोड व्यावसाय म्हणून मांगूर मासे पालन व्यवसाय करीत आहोत.
    – हनुमंत जाधव, मासे उत्पादक, पळसदेव
  • बंदी असलेला माशा मोठ्या प्रमाणात पालन केले जाते यावर कुठल्याही अधिकार्याचा अंकुश राहिला नाही .व कामे वेळात अधिक पैसा कमवण्यासाठी आशय प्रकारे नागरिकांच्या जीवशी खेळणारा व्यवसाय तलवकरात बंद करावा व उजनीचे होणारे पाणी प्रदूषण थांबवावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.