फौवादच्या रौप्यपदकासह इक्वेस्ट्रीयनमध्ये भारताला दोन रौप्य 

36 वर्षानंतर भारताला घोडेस्वारीत मिळाले पदक 
जकार्ता: फौआद मिर्झाने वैयक्तिक गटात, तर राकेश कुमार, आशिष मलिक, जितेंदर सिंग व मिर्झा यांनी सांघिक गटात भारताला अश्वशर्यतीत रौप्यपदकं जिंकून दिली. आशियाई स्पर्धेत तब्बल 36 वर्षांनंतर भारतीय घोडेस्वाराने वैयक्तिक गटात पदक जिंकण्याचा पराक्रम केला. घोडेस्वार फौआद मिर्झाने रौप्यपदक जिंकून दिले 1982 नंतर घोडेस्वाराने पटकावलेले हे पहिलेच पदक ठरले. त्याने 26.40 गुणांची कमाई करताना ही विक्रमी कामगिरी केली.
जपानच्या ओईवा ओशियाकीने सुवर्ण पदक पटकावल्याने मिर्झाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. चीनचा हुआ तिआन ऍलेक्‍स तिसऱ्या क्रमांकावर राहिला. तर दुसरीकडे, भारताने सांघिकमध्ये सुद्धा दमदार कामगिरी बजावली. राकेश कुमार, आशीष मलिक आणि जितेंद्र सिंग यांनी केलेल्या 121.30 स्कोअरमुळे भारताने रौप्य पदक पटकावले. सांघिक स्पर्धेत सुद्धा जपानचा दबदबा पाहायला मिळाला. जपानने 82.40 च्या स्कोअरने सुवर्ण पदक तर थायलंडने 126.70 चा स्कोअर करीत कांस्य पदक पटकावले.
वैयक्तिक प्रकारात घोडेस्वार फौवादचे मिर्झा याने हे यश संपादन केले. महत्वाचे भारताला तब्बल 36 वर्षांनंतर “इक्वेस्ट्रीयन’ या क्रीडाप्रकारात वैयक्तिक रौप्यपदक मिळाले. भारतीय घोडेस्वार फौवाद मिर्झा याने हे रौप्यपदक मिळवले. त्याने आणि त्याचा घोडा सिगनूर मेडिकोट याने 22.70 या वेळेत शर्यत पूर्ण केली. भारताला 1982 साली नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये वैयक्तिक पदक मिळाले होते. त्यानंतर ही कामगिरी प्रथमच करण्यात आली आहे. या स्पर्धेत जपानच्या ओइवा योशीआकी याला पहिला क्रमांक मिळाला. तो आणि त्याचा घोडा बार्ट एल ज्रा यांनी ही शर्यत 22.60 एवढ्या वेळेत पूर्ण केली. याशिवाय, भारताने सांघिक प्रकारातही “इक्वेस्ट्रीयन जम्पिंग’मध्ये रौप्यपदक मिळवले. त्यामुळे भारताच्या खात्यात 2 रौप्यपदकांची भर पडली.
इंडोनेशिया येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये शनिवारी गोळाफेकपटू तजींदर पाल सिंग तूर याने सुवर्ण पदक पटकवल्यानंतर आज स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताने “इक्वेस्ट्रीयन’ या घोडेस्वारीच्या प्रकारात दोन रौप्यपदके पटकावली. यापैकी एक पदक हे वैयक्तिक स्वरूपाचे तर एक सांघिक प्रकारातील ठरले. सांघिक गटातही भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय संघाने 121.30 गुण मिळवले. जपान व थायलंड यांनी अनुक्रमे सुवर्ण व कांस्यपदक जिंकले. भारताने आताप्रयंत अश्‍वशर्यतीत एकूण तीन सुवर्ण, 3 रौप्य आणि 6 कांस्य अशी 12 पदकं जिंकली आहेत. यातील सर्वाधिक दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी चार पदकं ही 1982च्या आशियाई स्पर्धेत जिंकली आहेत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)