फोर्ब्सच्या यादित स्मृती मंधना आणि हिमा दास यांचा समावेश

file photo

नवी दिल्ली: भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मंधना आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे नाव उज्वल करणाऱ्या हिमा दास यांचा फोर्ब्सच्या यादीत समावेश करण्यात आला असून राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्राचाही या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. फोर्ब्सने भारताची 30 अंडर 30 अशी एक यादी तयार केली आहे. या यादीमध्ये स्मृती आणि हिमा यांचा समावेश करण्यात आला आहे. फोर्ब्स प्रकाशीत करत असलेल्या या यादीमध्ये प्रत्येक देशातील 30 वर्षांखालील युवकांचा सन्मान केला जातो. 30 वर्षांखालील ज्या व्यक्तींनी दैदिप्यमान कामगिरी केली आहे, त्यांना या यादीमध्ये स्थान दिले जाते.

फोर्ब्स इंडियाच्या ’30 अंडर 30′ या आवृत्तीचे हे सहावे वर्ष आहे. या यादीमध्ये खेळाबरोबर एंटरटेनमेंट, मार्केटिंगसहित अन्य काही क्षेत्रांचाही समावेश करण्यात आला आहे. या वर्षीच्या यादीमध्ये एकूण 16 क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात आला आहे. या यादीसाठी पहिल्यांदाच उद्योग, उर्जा, मार्केटिंग, मीडिया, कृषी या क्षेत्रांचाही समावेश करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)