फोनवरुन त्रास देत विनयभंग

पिंपरी – अनोळखी क्रमांकावरून फोन करून विवाहितेला शिवीगाळ करत विनयभंग केल्याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोपान सहाणे (पत्ता व वय माहिती नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला आरोपीने 7066260020, 776905993, 776905993 या वेगवेगळ्या क्रमांकावरून 26 व 27 जानेवारी या कालावधीत फोन करून शिवीगाळ केली. तसेच मनास लज्जा उत्पन्न होईल अशा अश्‍लिल भाषेत तो बोलत होता. या त्रासाला कंटाळून महिलेने पोलीस ठाणे गाठले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)