फोटो मतदार यादीसाठी कॉंग्रेसने आयोगाचा सर्व्हर हॅक केला

भोपाळ (मध्ये प्रदेश) – फोटो मतदार यादीसाठी कॉंग्रेसने आयोगाचा सर्व्हर हॅक केल्याचा आरोप भाजपाने केला आहे, तर मुख्यमंत्री निवास राजकारणाचा अड्डा बनला असल्याचा आरोप करत कॉंग्रेसने तेथे होणाऱ्या भाजपाच्या कार्यक्रमावर बंदी आणण्याची मागणी कॉंग्रेसने केली आहे.

मध्य प्रदेश निवडणूक तयारीसंदर्भात राजकीय पक्षांच्या समस्या समजून घेण्यासाठी आलेल्या निवडणूक आयोगाच्या पूर्ण पीठासमोर कॉंग्रेस आणि सत्ताधारी भाजपा यांनी परस्परांवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. मुख्यमंत्री निवास राजकीय अड्डा बनल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आणि तेथे चाललेल्या भाजपाच्या कार्यक्रमांवर बंदी आणावी; त्याचप्रमाणे विविध योजनांद्वारे घराघरांत लावलेले मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचे फोटो असलेली टाईल्स काढून टाकावीत अशी मागणी केली. निवडणूक मतपत्रिकांद्वारेच व्हावी अशी आपली मागणीही कॉंग्रेसने लावून धरली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माजी खासदार सज्जनसिंह वर्मा यांचे नाव इंदूर आणि देवासच्या मतदार यादीत असल्याची आणि मतदार यादीमध्ये गडबड असल्याची खोटीच तक्रार करत निवडणूक कर्मचाऱ्यांवर कॉंग्रेस दबाव आणत असल्याची तक्रार भाजपाने केली आहे. निवडणूक आयोगाने फोटो मतदार यादी देण्यास नकार दिला असूनही कॉंग्रेसकडे फोटो मतदार यादी कशी आली आहे? असा प्रश्‍न करून कॉंग्रेसने निवडणूक आयोगाचा सर्व्हर हॅक करून ती मिळवल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

आरएसएसच्या कार्यालयात जाणाऱ्यांना निवडणूक ड्यूटी लावू नये अशी मागणी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.
कॉंग्रेस पक्षातर्फे माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी, पक्ष प्रवक्ता जेपी धनिदिया यांनी निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडली, कॉंग्रेसच्या तक्रारीनंतर मतदार यादीतून 24 लाख बनावट नावे कमी केली असली, तरी 11 लाख नवीन नावे समाविष्ट केली आहेत; त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी कॉंग्रेसने केली.

भाजपा तर्फे महसूल मंत्री उमाशंकर गुप्ता, सहकार मंत्री विश्‍वास सारंग आणि प्रदेश उपाध्यक्ष विजेश लूनावत यांनी आयोगाची भेट घेतली. ज्यांचे नावे मतदार यादीतून कमी कराण्यात आली आहेत, त्यांची नावे वेबसाईटवर जाहीर करावीत आणि मोबाईलवर त्यांना माहिती द्यावी अशी मागणी भाजपाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)