फेरमतदान होईपर्यंत मतमोजणी नको – प्रफुल्ल पटेल

गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक मतदान प्रक्रियेदरम्यान दोन्ही जिल्ह्यातील अनेक केंद्रावरील ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिन बंद असल्याने हजारो मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ३४ मतदान केंद्रावरील मतदान थांबविण्याचे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे जोपर्यंत येथील फेरमतदान होत नाही, तोपर्यंत देशात ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होत आहेत. तेथील मतमोजणी करु नये अशी मागणी प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत केली.

ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिनमध्ये बिघाड असल्याच्या तक्रारी केवळ गोंदिया-भंडारा लोकसभा क्षेत्रात नसून पालघर व उत्तरप्रदेशातील बरहाणपूर येथे सुध्दा ३०० वर ईव्हीएममध्ये बिघाड आल्याची माहिती आहे. त्यामुळे या ईव्हीएम मशीनच्या विश्वासहर्तेवर पुन्हा प्रश्न निर्माण झाला असल्याचे पटेल यांनी सांगितले. भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सुरत येथून मागविलेल्या ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिन्सवर आम्ही सुरूवातीपासून आक्षेप घेतला होता. यासंबंधीची तक्रार सुध्दा मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली होती. मात्र त्यांनी याची गांर्भियाने दखल घेतली नाही. त्याचाच फटका सोमवारी मतदान प्रक्रियेदरम्यान बसला. महाराष्ट्रात ईव्हीएम मशिन व व्हीव्हीटीपॅट उपलब्ध असताना सुरत येथून मशिन मागविण्याची गरज काय होती? महाराष्ट्रातील तापमान मार्च ते मे दरम्यान सर्वाधिक असते ही बाब सर्वांनाच माहिती आहे. मग अधिक तापमानामुळे व्हीव्हीटीपॅट मशिन काम करीत नसल्याचे निवडणूक विभागाचे अधिकारी सांगत आहे. यावरुन नेमके काय समजायचे असे पटेल म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आमचा लोकशाही पध्दतीवर विश्वास असून निवडणुका हे त्याचेच प्रतिक आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पादर्शकपणे पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक विभागाची आहे. ईव्हीएममधील बिघाडाबाबत आपला कुठल्याही राजकीय पक्षावर आरोप नसून हा सर्व निवडणूक विभागाचा गलथान कारभार आहे. जर अधिक तापमानामुळे व्हीव्हीटीपॅट मशिन बंद पडत असतील किंवा काम करीत नसतील तर ज्या मशिन सुरु आहेत त्या देखील योग्य तºहेने काम करीत आहेत का? हे कसे समजायचे असा सवालही पटेल यांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)