फेरपरीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी वणवण

पारंपरिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची संख्या 70 टक्‍के
पुणे – राज्यात इयत्ता बारावीच्या फेरीपरीक्षेचा निकाल जाहीर झाला असला तरीही फेरपरीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची मात्र प्रवेशाची वणवण कायम दिसत आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश संस्थास्तरावर उपलब्ध आहे तर पारंपरिक अभ्यासक्रमांचे प्रवेश मात्र जवळपास फुल्ल झाले असल्याने विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्ष वाया जाणार का, असा धोका निर्माण झाला आहे.
पुणे विभागीय बोर्डातून बारावी फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही 4 हजार 141 आहे. त्यापैकी 35.23 टक्‍के विद्यार्थी हे विज्ञान शाखेतील, 15.98 टक्‍के विद्यार्थी हे कला शाखेतील, 21.12 टक्‍के विद्यार्थी हे वाणिज्य शाखेतील व 17.09 टक्‍के विद्यार्थी हे व्होकेशनलमधील आहेत. विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्ष वाया जाऊ नये हाच हेतू ठेवून शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑक्‍टोबरऐवजी जुलैमध्ये घेतली. मात्र परीक्षा उत्तीर्ण झाली तरीही विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मात्र वणवण करावी लागत आहे. सध्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत मात्र ते संस्थास्तरावर आहेत. या विद्यार्थ्यांनी संस्थास्तरावर हे प्रवेश घेतल्यास त्यांना शिष्यवृत्ती व अन्य योजनांचा लाभ मिळणार नाही. तर पारंपरिक अभ्यासक्रम घेऊन शिक्षणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही सत्तर टक्‍क्‍याहून अधिक आहे. मात्र अनेक महाविद्यालयातील प्रवेश पूर्ण होऊन अभ्यासक्रमही निम्म्यावर आला आहे. त्यामुळेच आता प्रवेश घ्यावेत तरी कुठे असा प्रश्‍न या विद्यार्थ्यांना पडला आहे. दरम्यान याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आवाज उठविला असून राज्याच्या उच्च शिक्षण संचालकांना याबाबतची माहिती पत्र लिहून कळविली आहे.

फेरीपरीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संस्थास्तरावरुन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व अन्य योजनांचा लाभ मिळावा तसेच पारंपरिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्यांना प्रवेशासाठी जागा उपलब्ध करुन द्याव्यात याबाबत आम्ही उच्च शिक्षण संचालकांना पत्र लिहिले आहे.
कल्पेश यादव, शहर अध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)