फूस लावून पळवून नेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे – अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी तरुणास अटक केली. त्याला 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोने यांनी दिला आहे.
आकाश सुधाकर नागमोडे (वय 19, रा. अनगळ पार्क, चतु:श्रृंगी मंदिराजवळ) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी 17 वर्षीय पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. कदम याने 18 जुलै रोजी रात्री रात्री साडेसात वाजता गोखलेनगर येथून पीडितला फूस लावून पळून नेले. तेथून तो तिला सुरुवातील मुंबईला, त्यानंतर कर्नाटकातील बिदर येथे घेवून गेला. तेथे एका खोलीत तिच्यावर आत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी केली होती. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)