फिल्मफेअरच्या कव्हरपेजवर जान्हवी – ईशान

बॉलीवुडची सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि तिचा सहकलाकार इशान खट्‌टर यांनी नुकतेच “सैराट’ या मराठी चित्रपटाच्या हिंदी रिमेक “धडक’ या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट सध्या बॉक्‍स ऑफिसवर चांगलीच कमाई करताना दिसत आहे. इशान आणि जान्हवी या चित्रपटाच्या निमित्ताने बराच वेळ एकमेकांबरोबर घालवत असून प्रेक्षकांच्या पसंतीस देखील त्यांची जोडी उतरताना दिसत आहे. त्यातच आपल्या आगामी आवृत्तीच्या कव्हरफोटोसाठी प्रसिद्ध मासिक फिल्मफेअरने इशान-जान्हवीची निवड केली आहे.

जान्हवी कपूरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नुकतेच आगामी फिल्मफेअर मॅगझीनचे कव्हरपेज शेअर केले आहे. ज्यात ती आणि इशान खट्‌टर एकत्रितपणे झळकले आहेत. “धडक’च्या या जोडीने फिल्मफेअरच्या ऑगस्ट महिन्याच्या आवृत्तीसाठी नुकतेच फोटोशूट केले आहे. ते दोघेही या फोटोमध्ये कुल अंदाजात दिसून येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच जान्हवीने अन्य काही फोटोही शेअर केले आहेत. ज्यात ती खूपच सुंदर आणि स्टाईलिस्‌ दिसते. या फोटोत जान्हवीने हॉट पैंट आणि क्रॉप टॉप घालत हटके पोज दिल्या आहेत. त्यांचा या फोटोमधील अंदाज चाहत्यांच्या पसंतीत उतरत असून त्यांनी या जोडीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)