फिफा विश्‍वचषक स्पर्धा सराव सामने : फ्रान्स व इटली यांचे चमकदार विजय 

पॅरिस – फ्रान्स आणि इटली या बलाढ्य संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करताना फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सराव सामन्यांत विजयाची नोंद केली. परंतु ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गैरहजेरीत खेळणाऱ्या पोर्तुगालला बरोबरीत रोखताना ट्युनिशियाने अनपेक्षित कामगिरी बजावली. तसेच वेल्सनेही मोक्‍सिकोला बरोबरीत रोखताना समाधानकारक प्रारंभ केला.

ऑलिव्हर गिराऊड आणि नेबिल पेकिर यांच्या अचूक लक्ष्यवेधामुळे पॅरिसमधील स्टेड डी फ्रान्स स्टेडियमवर झालेल्या सराव सामन्यात फ्रान्सने आयर्लंड प्रजासत्ताक संघाला 2-0 असे पराभूत केले. फ्रान्सला 40व्या मिनिटाला मिळालेल्या कॉर्नरवर फेकिरने दिलेल्या पासवर गिराऊडने अचूक लक्ष्यवेध करीत आपल्या संघाचे खाते उघडले. त्यानंतर मध्यंतराला एक मिनिट बाकी असताना फेकिरने फ्रान्सचा दुसरा गोल केला. या वेळी कायलियान एमबाप्पेने गोलक्षेत्रातच दिलेल्या अचूक पासवर फेकिरने आयर्लंडच्या गोलरक्षकाला सहज चकविले. त्यानंतर उत्तरार्धात मात्र फ्रान्सला एकही गोल करता आला नाही. फ्रान्सचे प्रशिक्षक दिदियर देसचॅम्प्स यांनी या विजयाबद्दल समाधान व्यक्‍त केले. तीनपैकी पहिला सामना जिंकल्यावर उरलेले दोन सराव सामने खेळण्यासाठी फ्रान्सचा संघ रशियाला रवाना होत आहे. घरच्या मैदानावर ही स्पर्धा जिंकणाऱ्या फ्रान्सला 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा विश्‍वविजेतेपदासाठी संधी आहे.
स्वित्झर्लंडमधील सेंट गॉलन येथे झालेल्या दुसऱ्या सराव सामन्यात इटलीने सौदी अरेबियाचे आव्हान 2-1 असे मोडून काढले. मारियो बालोटेल्लीने 21व्या मिनिटाला लक्ष्यवेध करताना इटलीचे खाते उघडले. 2014 विश्‍वचषक स्पर्धेनंतर बालोटेल्लीचा इटलीसाठी हा पहिला गोल ठरला. बालोटेल्लीनेच 10 मिनिटांनी रिबाऊंडवर इटलीचा दुसरा गोल केला. याह्या अल शेहरीने इटलीचा बचावपटू डेव्हिड झाप्पाकॉस्टाच्या चुकीचा फायदा घेत सौदी अरेबियाचा एकमेव गोल नोंदविला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येत्या 14 जून रोजी सुरू होत असलेल्या विश्‍वचषक स्पर्धेत सौदी अरेबियासमोर सलामीला यजमान रशियाचे आव्हान असून पात्रता पेरीत गारद जालेल्या इटलीला घरीच बसावे लागणार आहे. इटलीची सध्या विश्‍वक्रमवारीत 20व्या कमांकावर घसरगुंडी झाली आहे. इटली संघ फ्रान्स आणि हॉलंड यांच्याशी दोन सराव सामने मात्र खेळणार आहे. तसेच सौदीचे सराव सामने पेरू आणि जर्मनीशी होणार आहेत.

ट्युनिशियाने पोर्तुगालला बरोबरीत रोखले 
ब्रॅगा येथे झालेल्या सराव सामन्यात एसी मिलान संघाचा प्रमुख आक्रमक आन्द्रे सिल्व्हा याने पोर्तुगालचा 1000वा गोल नोंदविताना ऐतिहासिक कामगिरी बजावली. परंतु फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सराव सामन्यात ट्युनिशियाने 2-2 असे बरोबरीत रोखल्यामुळे पोर्तुगालला या गोलचा आनंद घेता आला नाही. अर्थात पोर्तुगाल संघ या सामन्यात त्यांचा मुक्‍य स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गैरहजेरीत खेळत होता. मार्च महिन्यात हॉलंडकडून झालेल्या 0-3 अशा पराभवातून अद्याप सावरत असलेल्या पाठीराख्यांना या सराव सामन्यात विजयाची अपेक्षा होती. परंतु नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स लीग अंतिम लढतीत रिअल माद्रिदला लिव्हरपूलवरील विजयासह विजेतेपद मिळवून देणाऱ्या रोनाल्डोला विश्रांती देण्याचा निर्णय पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नांडो सांतोस यांनी घेतला. त्यामुळे पोर्तुगालला बरोबरीवर समाधान मानावे लागले. उरलेल्या दोन्ही सराव सामन्यांतही पोर्तुगालला रोनाल्डोशिवायच खेळावे लागण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)