फारूक अब्दुल्ला यांच्या पीएसएनुसार कारवाई

श्रीनगर : जम्मू काश्‍मिरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांना सामाजिक सुरक्षा कायद्यान्वये (पीएसए) रविवारी कारवाई करण्यात आली. त्यानुसार त्यांना दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी ताब्यात घेतले जाऊ शकते. अब्दुल्ला यांना त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. त्यांना त्यांचे नातेवाईक आणि मित्रांना भेटण्याची मुभा देण्यात आली आहे.

इंडियन एक्‍सप्रेसच्या संकेतस्थळावर दिलेल्या वृत्तानुसार, फारूक अब्दुल्ला यांना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना बेकायदा ताब्यात ठेवल्याचा संशय व्यक्त करत एमडीटमकेचे नेते वैको यामनी सर्वोच्च न्यायालयात हेबियस कॉपर्स याचिका दाखल केली. न्यायालयाने केंद्र आणि राज्य प्रशासनाला नोटीस बजावली त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले.

अबदुला यांना सरकारने ताब्यात घेतले नाही. पण, त्यांना घरातून बाहेर पडायचे नसेल तर त्यांच्या कानपट्टीवर गन ठेऊन बाहेर आणता येणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेला सांगितले होते. या पार्श्‍वभूमीवर या कारवाईने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.