फायनान्स कंपनीची 48 लाखाची फसवणूक प्रकरणात एकाला पोलीस कोठडी

पुणे- श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी प्रा. लि. कंपनीची 48 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकास चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली. त्याला 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी एच. आर. जाधव यांनी दिला आहे.
राजेंद्र बाबुराव शिंदे (वय 49, रा. हडपसर, मुळ रा. शिंदेवाडी, फलटण) असे पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर निवृत्ती नागोजी दळवी (रा. साईनगर खराडी) याच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी संदीप मनोहर हुले (वय 34, रा. हॉटेल पंचमी समोर, सातारा रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. फसवणुकीचा हा प्रकार 30 जून 2008 पासून गुन्हा दाखल होईपर्यंत घडला. आरोपींनी तीन डंपर घेण्यासाठी श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी प्रा. लिकंपनीकडून कर्ज घेतले. गाड्या विकत घेतल्यानंतर त्यांनी परस्पर या गाड्या विकल्या. त्यातून आलेले पैसे फायनान्स कंपनीला न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी शिंदे याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी पुढील तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील एस. ए. क्षीरसागर यांनी केली. ती मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)