फसव्या दाव्यांचा भूलभूलैया (भाग-१)

बाजारात सध्या काही कंपन्यांकडून हेल्दी फूडच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केली जात आहे. डायट फूडच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना सर्रास उघडकीस येत आहेत. शुगर फ्री, लठ्ठपणा कमी करणारी औषधं, प्रोटिन फूड यांसारखी उत्पादने ही खरोखरच नागरिकांच्या आरोग्याला पोषक आहेत का? याचा कोणीही विचार करत नाही. वास्तविक काही फूड कंपन्यांचे जाळे एवढे घट्ट विणले गेले आहे, की त्यापासून कोणीही वाचू शकत नाही. म्हणूनच यावर अंकुश ठेवण्यासाठी कंपन्यांनी दिलेली आश्‍वासनं फसवे किंवा बिनबुडाचे निघाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करणे महत्त्वाचे ठरत आहे.

बाजारात शुगर फ्रीचा दावा करणाऱ्या काही कंपन्यांच्या खाद्य आणि पेय पदार्थात समाविष्ट करण्यात येणारे स्वीटनर हे साखरेप्रमाणेच हानीकारक आहे. ब्रिटिश मेडिकल जनरलने यासंदर्भात प्रकाशित केलेले संशोधन हे झोप उडवणारे आहे. भारतासह जगभरात मधुमेहाचा प्रसार वेगाने होत असताना आणि साखरेला पर्याय म्हणून कोट्यवधी नागरिक शुगर फ्रीचा बिनदिक्कत वापर करत असताना हे संशोधन खळबळजनक आहे. संशोधनातील निष्कर्ष हे धोक्‍याची घंटा वाजवणारे आहे. शुगर फ्री म्हणून सांगितले जाणारे पदार्थ हे उपयुक्त ठरण्याऐवजी नुकसानकारक सिद्ध होत आहेत. अशा स्थितीत बाजारात शुगर फ्रीचा प्रसार करणाऱ्या कंपन्यांच्या विश्‍वासाला धक्का लागू शकतो. ही बाब शुगर फ्रीपुरतीच मर्यादित नसून शुगर फ्रीच्या नावाखाली आरोग्याला हानीकारक ठरणाऱ्या पदार्थाचा ज्या रितीने वापर केला जात आहे, त्यावरून काही कंपनीच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फसव्या दाव्यांचा भूलभूलैया (भाग-२)

विशेष म्हणजे शुगर फ्रीच्या नावाखाली बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे. वेळोवेळी झालेल्या संशोधनातून खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेबाबत सादर केलेले दावे हे प्रत्यक्षात उलटे असल्याचे निदर्शनास येते. म्हणजेच आरोग्यदायी वस्तू म्हणून विकली जाणाऱ्या या उत्पादनाची शास्त्रीय चाचणी केली जाते की नाही, यावरही संशय व्यक्त केला जात आहे. अशा गोष्टीच्या सेवनाने नागरिकाला कोणतीही हानी होणार नाही, असे ठोसपणे कोणतीही कंपनी सांगू शकत नाही किंवा एखाद्या चाचणीतून निष्कर्षही निघालेला नाही. तरीही आकर्षकरीत्या जाहीरातबाजी करून लोकांना भरीस पाडण्याचे काम केले जात आहे.

– अपर्णा देवकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)