फळे भाजीपाला पिकासाठी उन्हाळ्यामध्ये आच्छादन : एक वरदान

पिकांना दिलेले पाणी आणिओलावा सूर्याच्या उष्णतेने वाफ होऊन जमिनीतून उडून जाते. अशा प्रकारे वाफेने उडून जाणारे पाणी जमिनीवर आच्छादन करून थोपवून धरल्यास त्या पाण्याचा उपयोग वनस्पतीच्या पिकांच्या निकोप वाढीसाठी होऊ शकतो. त्यासाठी फळबागेत इतर कोणत्याही पिकांत आच्छादन करणे खूप फायद्याचे तर आहेच पण अत्यावश्‍यक आहे.

जून ते सप्टेंबर या काळात उष्णतेने पाणी उडून जाण्याचे प्रमाण कमी म्हणजे प्रतिदीन 4 ते 5 मि.मी. तर हिवाळ्यात हे प्रमाण आणखी कमी म्हणजे प्रतिदीन सरासरी 3 ते 4 मि.मी इतके असते.याकाळात या फळबागांना आच्छादनाची गरज नसते. मात्र फेब्रु. ते मे या काळात हेच प्रमाण प्रतिदिन 7 ते 8 मि.मी पासून 14 ते 15 मि.मी. पर्यंत वाढते.खूप मोठ्या प्रमाणात ओलाव्याचे बाष्पीभवनहोते हे रोखण्यासाठी आच्छादनाचा चांगलाउपयोग होतो.
कोरडवाहू शेतीत पावसाचे प्रमाणखूप कमी असते. त्यामुळे जमिनीत जे काहीपाणी किंवा ओलावा असतो त्याचा योग्य वापरव्हावा म्हणून आच्छादन हवे.

आच्छादन केल्यामुळे पाण्याची बचत व उत्पादन वाढविण्यास मदत होते.पिकांची पाण्याची गरज 20 ते 30 टक्क्‌यांनी कमी होते तसेचजमिनीत हवा खेळती राहते. तणाचा प्रादूर्भाव कमी होतो. आच्छादन हे काटकसरीने पाणी वापरण्याचे महत्वाचेतंत्रज्ञानआहे. अशा तंत्राचा वापर करण्यासाठी फळबागांच्या वाक्‍यात, कोरडवाहू पिकात बाष्पी भवनामुळे भूपृष्ठावरून जमिनीत 73 % ओल निघून जातेती थोपविण्यासाठीशेतात उभ्या पिकात दोन ओळींमध्ये काहीकचरा, पालापाचोळ, गवत, पाचट,तुकाटा, ज्वारीची घसकटे, वाळलेले गवतइ. सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

(मल्चिंगमुळे) होणारे फायदे :
1.हे पाणीवापरात 40 ते 60 टक्केबचत होते. 2.तन नियंत्रीत किंवा फार कमी प्रमाणातउगवते. 3.जमिनीत सुक्ष्म जीवाची वाढ होते आणित्यामुळे जमीन सजीव बनते. 4.पिकाची वाढ जोमाने होते 5.अन्नद्रव्ये उपलब्धता तसेच सूक्ष्मजीव संख्येत वाढ होते. 6.सुधारणेसाठी उपयुक्त मुळाची क्षमतावृद्धी होते 7.कमी उत्पादन खर्चात भरघोस उत्पादनाची हमी मिळते. 8.जमिनीत ओलावा जास्त काळ टिकूनराहतो 9.वापरलेले सेंद्रिय पदार्थ कालांतराने कुजतात त्यामुळे जमिनीत हयूमसचे प्रमाणवाढते उत्पादन चांगले मिळते. शक्‍यतो फळबाग, भाजीपाला आणि कोरडवाहू शेती पिकात आच्छादनाचा आवश्‍य वापर करावा 10. उपलब्ध पाण्याची बचत करता येते वबचत झालेले पाणी इतर पिकांसाठी किंवालगवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी वापरता येते. 11. पुरेसे शेणखत नसेल तर मल्चिंगचे खतचांगला पर्याय आहे.

घेण्यात येणार पिकेप्लास्टिक आच्छादनाची जाडी (मायक्रोन) – उन्हाळी भुईमूग 7 पर्यंत मध्यम कालावधीची पिके 40 ते 50 जास्त कालावधीची पिके 50ते 100, भाजीपाला20 ते 25

आच्छादनाचे प्रकार :
सेंद्रिय आच्छादन : ज्वारीचे धसकटे, तुरकड्या वाळलेली पाने इ. ववापर करून जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे म्हणजे सेंद्रिय आच्छादन.
असेंद्रिय आच्छादन : यामध्ये वेगवेगळे आच्छादन वापरले जातात उदा. चंदेरी, काळ्या, पिवळ्या, पांढऱ्या, लाल,निळ्या, आकाशी पारदर्शक रंगाचे प्लास्टिक वापरले जाते.
असेंद्रिय आच्छादनाचे फायदे – 1.बाष्पीभवन कमी होते. 2.सुर्यप्रकाश जमिनीवर पोहचतो

स्नेहल खलाटे 

कांदा लसूण केंद्र, पुणे 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)