फलटण बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य

फलटण : बसस्थानकात ठिकठिकाणी साचलेली चिखलाची डबकी. (छाया : अजय माळवे)

प्रवाशांचे अतोनात हाल : उपाययोजना करण्याची मागणी

फलटण, दि. 28 (प्रतिनिधी) – फलटण शहर आणि तालुक्‍यात सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे फलटण बसस्थानकातील उखडलेल्या रस्त्यामध्ये पाणी साचले असून प्रचंड दलदल, चिखल निर्माण झाला आहे. चिखलातून एसटी बसमध्ये चढताना प्रवाशांचे हाल होत असून याबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
फलटण हे जिल्ह्याचे व आंतरराज्य वाहतुकीचे मध्यवर्ती ठिकाण आहे. या बसस्थानकातून दिवसभर शेकडो बसेसची वर्दळ असते. दररोज हजारो प्रवाशांची ये-जा सुरू असते. गेल्या तीन-चार वर्षांपासून स्थानकात मोठमोठे खड्डे पडले होते. त्याकडे आगार व्यवस्थापनाने वेळीच लक्ष दिले नाही. खड्यात मुरूम, माती, बांधकामाचे दगड, विटा टाकण्यात आल्या. गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे हे खड्डे पाण्याने भरले. सध्या येथे पुन्हा डबकी तयार झाली आहेत. गर्दीने गजबजलेल्या बसस्थानकात कसरत करून बसमध्ये चढावे लागत आहे. त्याचवेळी बस आल्यावर चिखलाचे पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फलटणच्या एसटी आगारातील रस्त्याचे डांबरीकरण गेल्या कित्येक वर्षापासून झालेले नाही. त्यामुळे स्थानकामध्ये मोठ-मोठे खड्डे पडलेले होते. मोठमोठ्या खड्ड्यामुळे प्रवाशांना खूप त्रास होत होता. आगारात मुख्य इमारतीच्या बांधकामाच्या वेळी निघालेल्या माती-विटा यातून हे खड्डे बुजवण्यात आले. मात्र, काही दिवसांतच ते उखडून गेले. आगारातील रस्त्याचे पूर्ण डांबर उखडले गेले आहेत. त्यामुळे सगळीकडे चिखलच चिखल झालेला आहे. यातूनच प्रवाशांना एसटीमध्ये चढावे लागत आहे. एसटी येताना जाताना उडणारा चिखल प्रवाशांच्या कपडे खराब करत आहे. शालेय मुलांचे युनिफॉर्म खराब होत आहे. चालत येणाऱ्या प्रवाशांना चिखलातून चालत यावे लागत आहे. अनेकजण गडबडीत पाय घसरून चिखलात पडत आहेत. यामुळे एखादी दुर्घटना होण्याचा संभव आहे. वृद्ध आणि महिला प्रवाशांचे चिखलातून चालताना हाल होत आहेत. एवढा चिखलाचा राडा होऊनही प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेऊन वागत आहे. सध्या फलटण एसटी आगाराच्या इमारतीचे बांधकाम गेल्या वर्षापासून सुरू आहे. एक वर्ष चाललेल्या बांधकामामुळे प्रवासी त्रस्त झालेले आहेत. बांधकामाचा सामानाचा राडारोडा आहे. इमारतीचे बांधकाम कधी पूर्ण होणार याचा थांगपत्ता कुणालाच नाही. इमारत बांधकामासाठी किती खर्च मंजूर झाला आहे हे कोणाला माहिती नाही. बांधकामाबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही. अशा परिस्थितीत पुन्हा चिखलामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अगोदरच फलटण एसटी आगाराच्या भोंगळ कारभार आणि वरिष्ठ अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे एसटी आगाराची वाताहत झाली आहे. आगारात अनेक जुन्या, नादुरुस्त, मोडक्‍या बसेस आहेत. या बसेस कोठेही बंद पडणे, नादुरुस्त होणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यातच आगारात चिखल झाल्याने प्रवाशी पूर्णपणे वैतागले गेले आहेत.

फलटण एसटी आगार पूर्णता समस्यांचे आगार बनले आहे या आगाराला कोणी वाली आहे का असा प्रश्न पड़त आहे प्रवाशांच्या तक्रारीकड़े पूर्णता दुर्लक्ष केले जात असून आगारात चिखलामुळे चाल्ने अवघड झाले आहे चिखलामुळे कपड़े खराब होत आहे एसटी बसेस मध्येही चिखल होत आहे वरिष्टानि आता जनाची नाहीतर मनाशी तरी लाज बाळगुन सुधारना करावी
– तुकाराम जाधव, प्रवासी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)