फलटणला स्मार्ट करण्यासाठी साथ द्या

ना. रामराजे : नगरपालिकेत घनकचरा व्यवस्थापन बैठक
फलटण, दि. 30 -फलटणला अत्याधुनिक शहर बनवण्याचा प्रयत्न कमिन्स आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून सुरु असून नगरपालिका आणि नागरिक त्यास निश्चित साथ करतील असा विश्वास विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला.
फलटण नगरपालिकेच्या सभागृहात घनकचरा व्यवस्थापनबाबत बैठकीत ते बोलत होते. यावेळी संजीवराजे नाईक-निंबाळकर, सभापती सौ. रेश्मा भोसले, नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, नगरसेवक तसेच कमिन्सचे रितेश जोशी, संगीता गुप्ते, आरोहणम स्वयंसेवी संस्थेच्या ज्योती सातव, समीर बोटे, लक्ष्मीकांत जंबगी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कमिन्स आणि आरोहणमच्या माध्यमातून फलटणमधील घनकचरा व्यवस्थापनासाठी केलेले नियोजन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून उपस्थितांसमोर ठेवण्यात आले. वाढते शहरीकरण, कचर्‍यातील घटक बदल, भूमी भरणासाठी जागेचा अभाव आणि त्याला स्थानिकांचा विरोध, मिश्रकचरा हाताळणीच्या पध्दतीमुळे त्यावरील प्रक्रिया आणि विल्हेवाट काम कठीण होत असल्याने पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी ओला व सुका कचरा वेगळा करुन त्यावर योग्य तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया करण्याची संकल्पना समोर ठेवून यावर लोकसहभागातून मात करता येणे शक्य असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
फलटण शहर 7.16 चौरस कि.मी. मध्ये विस्तारले असून या शहराचे 3 विभाग पाडण्यात आले आहेत. त्यामध्ये 12 प्रभाग आहेत. शहराची लोकवस्ती 54500 असून शहरातील मिळकतींची संख्या 17658 आहे तर लगतच्या वाड्यावस्त्या आणि ग्रामीण भागातून दररोज शहरात येणारी लोकसंख्या सुमारे 10 हजार आहे. तर या शहरात प्रामुख्याने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा, राम रथोत्सव, गणेशोत्सव, दिपावली आणि नागपंचमी हे मोठे उत्सव साजरे होतात. या शहरात दररोज सुमारे 15 टन आणि प्रतिवर्षी 5475 टन कचरा निर्मिती होत असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.
प्रारंभी नगराध्यक्षा सौ. निता नेवसे यांनी सर्वांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात घनकचरा व्यवस्थापनाबाबत नगर परिषदेने केलेले नियोजन, सध्या सुरु असलेले काम या विषयी विवेचन केले. नगरसेवक अजय माळवे आणि कोळकीचे माजी सरपंच दत्तोपंत शिंदे यांनी घनकचरा व्यवस्थापनातील समस्यांबाबत विवेचन केले

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)