फलटणला धनगर समाजाचे बेमुदत धरणे आंदोलन

फलटण : फलटण तहसिलदार कार्यालया बेमुदत धरणे आंदोलनास बसलेले प्रारंभ.

फलटण, दि. 29 (प्रतिनिधी) – धनगर समाजाच्या एस. टी. आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी निर्णायक लढा उभा करण्यासाठी तसेच सोलापूर विद्यापिठाला पुण्यश्‍लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे नामकरण करण्यात यावे, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळास आर्थिक तरतूद करण्यात यावी इत्यादी मागणीसाठी फलटण तालुक्‍यात समाज बांधवाच्या वतीने दि. 29 पासून तहसिलदार कार्यालयासमोर आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
बारामती येथे 2014 मध्ये धनगर समाजाने मोठ्या प्रमाणावर आरक्षणाचा लढा उभा केला होता. समाजातील काही युवक दिवस बेमुदत उपोषणास बसले होते. त्या उपोषणाची सांगता करण्यासाठी तत्कालिन भाजपाचे प्रदेश अध्यक्ष व आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहून धनगर समाजास आरक्षण देवू, तो तुमचा घटनात्मक अधिकार आहे, असे सांगितले होते. त्यानंतर सोलापूर आणि बारातमीच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनगर समाज खूप मागास आहे, त्यांना आरक्षणाची गरज आहे आणि ते एस.टी.चे आरक्षण आम्ही देणारच, ही भूमिका मांडली होती.
यानंतर महाराष्ट्रात धनगर समाजामूळे सत्ता परीवर्तन व मला पदही धनगर समाजामूळेच मिळाले असे मत नागपूर मोर्चात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले होती. आमचे सरकार आल्यावर मंत्रिमंडळाच्या पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देवू असे आश्वासन दिले होते. आज चार वर्षात शेकडो कॅबिनेटच्या मिटिंग झाल्या तरी आरक्षणाची अंमलबजावणी केली जात नाही. त्यांना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. आजअखेर त्यांनी धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याशिवाय काही केले नाही. जर तात्काळ आरक्षण दिले नाही तर या सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय धनगर समाज राहणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
धनगर समाजाची बारामती, सोलापूर, माढा, बीड, सांगली, कोल्हापूर, सातारा, नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ, हातकणंगले या मतदार संघांसह राज्यातील अनेक लोकसभा व विधानसभा मतदार संघांत लक्षणिय लोकसंख्या आहे. याची जाणीव राज्यसरकारने ठेवावी. धनगर समाजामध्ये आलेली मरगळ व शिथिलता संपवून धनगर समाजाने या धरणे आंदोलनासाठी मोठ्या संख्येने हजर रहावे असे आवाहन धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)