फडणवीस यांना हटवल्यास पाठिंबा काढू; सरकारही कोसळेल

सात अपक्ष आमदारांचा इशारा
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदावरून हटवल्यास राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेऊ. एवढेच नव्हे तर, सरकारही कोसळेल, असा इशारा सात अपक्ष आमदारांनी दिला आहे. केवळ फडणवीसच मराठा आणि धनगर समाजांना आरक्षण मिळवून देऊ शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षण आंदोलनावरून सध्या राज्यातील वातावरण तापले आहे. अशातच राज्यातील चिंताजनक परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आल्याने भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागले असल्याचा दावा बुधवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. यापार्श्‍वभूमीवर, अपक्ष आमदारांनी आज त्यांची भूमिका मांडली. याबाबत बोलताना अपक्ष आमदार रवी राणा म्हणाले, फडणवीस यांना हटवल्यास माझ्यासह सात अपक्ष आमदार राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेतील. केवळ फडणवीस यांच्यामुळेच सरकार टिकूून आहे. शिवसेनेच्या आमदारांचं त्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा फडणवीस यांच्यावर जास्त प्रेम आहे, असा दावाही राणा यांनी केला. महाराष्ट्राच्या विकासासाठी फडणवीस चांगले कार्य करत असल्याचे प्रशस्तीपत्र त्यांनी यावेळी दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्र विधानसभेचे एकूण संख्याबळ 288 इतके आहे. भाजपचे 122 तर शिवसेनेचे 63 आमदार आहेत. भाजपला 7 अपक्षांबरोबरच बहुजन विकास आघाडीच्या 3 आमदारांनी पाठिंबा दिला आहे. एकमेव आमदार असलेला राष्ट्रीय समाज पक्षही भाजपच्या पाठिशी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)