प्रो-कबड्डीच्या लिलावातही राईट टू मॅच 

नवी दिल्ली – देशात क्रिकेटनंतर सर्वाधिक प्रेक्षकांची पसंती मिळालेल्या प्रो-कबड्डीने आता आयपीएलच्या पावलावर पाऊल ठेवण्याचं ठरवलं आहे. सहाव्या हंगामाच्या लिलावासाठी प्रो-कबड्डीमध्ये आयपीएलप्रमाणे राईट टू मॅच कार्ड वापरलं जाणार आहे. प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात हा नियम पहिल्यांदाच लागू करण्यात आलेला आहे. बिड टू मॅच या नावाने ही प्रक्रिया पार पडली जाणार आहे. 19 ऑक्‍टोबरपासून प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. सहाव्या हंगामासाठी महत्वाच्या संघांनी एकाही खेळाडूला कायम न राखता नव्याने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे राईट टू मॅच कार्डाद्वारे कोणता संघ कोणत्या खेळाडूला संघात कायम राखतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राईट टू मॅच कार्ड म्हणजे नेमकं काय?? 
एखाद्या हंगामात विशिष्ट संघाने कोणत्याही खेळाडूला आपल्या संघात कायम राखलेलं नसेल, मात्र लिलावादरम्यान इतर संघाने त्या खेळाडूला आपल्या संघात दाखल करुन घेतलं तर त्या खेळाडूच्या आधीच्या संघमालकाला राईट टू मॅच कार्डाद्वारे तो खेळाडू परत मिळवता येतो. यासाठी लिलावात त्या खेळाडूवर लागलेली रक्कम संघमालकाला द्यावीच लागते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)